‘आघाडीतील नेत्यांनी आपल्या जिभेला लगाम घालावा’, अनिल गोटेंनी टोचले स्वकियांचे कान, विरोधकांनाही टोला
अनिल गोटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय. त्याचबरोबर सत्ताचूर झाल्यानंतर आपल्याला कोण किती किंमत देतो? असा टोला गोटे यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.
धुळे : सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. अनिल गोटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय. त्याचबरोबर सत्ताचूर झाल्यानंतर आपल्याला कोण किती किंमत देतो? असा टोला गोटे यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. (Anil Gote advises leaders in the Mahavikas Aghadi government )
गोटे यांनी पसिद्धीपत्रकात काय म्हटलं?
आघाडीत सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करीत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वेच्छेने स्विकारली आहे. ती आपली जबाबदारी ओळखूनच आनंदाने पार पाडली पाहिजे. 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार आलं. त्या सरकारमध्ये जनसंघ, समाजवादी, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार पक्ष तसेच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेते आणि शरद पवारांचा एस. काँग्रेस वगैरे सहभागी होते. मतभेद तेंव्हाही होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत तेंव्हाही खडाजंगी होत असे. पण चुकूनही वृत्तपत्रात एकही वेडी-वाकडी बातमी आली नाही.
‘अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवित आहेत’
याउलट अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवित आहेत, हे काही शोभादायक नाही. आपले हसू होते हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी करणे आवश्यक आहे. हा वाईटपणा घेण्याची जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारली आहे. आज आपण आपला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच आपण काय बोलतो? याला प्रसिध्दी माध्यमामध्ये वजन आहे किंवा किंमत आहे. सत्ता गेल्या नंतर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनीच मागील पाच वर्षात अनुभवले आहे. आपण आत्मघात करुन पदरी काय पाडून घेणार आहोत . याचा अंतर्मुख होऊन प्रत्येकाने विचार करावा. अन्यथा, अशा वर्तवणूकीला “भिकेचे डोहाळे लागले” असेच म्हणावे लागेल, असं गोटे यांनी म्हटलंय.
भाजप नेत्यांनाही गोटे यांचा टोला
भाजपाचे अतिउत्साही आणि मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना असे काही वक्तव्य आले की, यांना हर्षवायूच होतो. त्यांनी वृत्तपत्रांना लगेच सांगितले की, “शिवसेनेचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा थरकाप उडाला.” त्याच दिवशी त्याच वर्तमान पत्रात भाजपातील मराठा समाजाचे नेते अॅड. अशिष शेलार यांनी मात्र “काँग्रेसचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही” असं जाहीर केलं. भाजपा नेत्यांनी पक्षांतर्गत असलेल्या नेतृत्व स्पर्धेचे उगाच जाहिर प्रदर्शन करु नये. बाहेर आपले हसे होते याचे विस्मरण पडू देऊ नका, असाही टोलाही गोटे यांनी भाजप नेत्यांना लगावलाय.
Video | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 AM | 14 July 2021#News | #NewsUpdates | #NewsAlert https://t.co/0H4pQXPYEy
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2021
संबंधित बातम्या :
कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच; चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोला
VIDEO: फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील; नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट
Anil Gote advises leaders in the Mahavikas Aghadi government