दोन बायका अन् फजिती ऐका…राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे का म्हणाले…

NCP Leader Eknath Khadse | एकनाथ खडसे भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी ते सोडत नाहीत. हे तीन रंगाचं हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका...अशी आहे.

दोन बायका अन् फजिती ऐका...राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे का म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 9:30 AM

रवी गोरे, जळगाव, दि.2 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ खडसे यांचा चांगलाच दबदबा आहे. भाजपमध्ये असताना ते विरोध पक्षनेते होते. त्यावेळी सभागृहात त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक वेळा अडचणीत आणले. भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी ते सोडत नाहीत. आता राज्यात तीन पक्षांचे महायुतीचे सरकार आहे. या सरकारवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारमधील आमदारांची बेरोजगारी कमी झाली मात्र राज्यात बेरोजगारांची संख्या वाढली, असा घाणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

दोन बायका आणि फजिती ऐका

राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. चोरी, दरोडे आणि इतर गुन्हे वाढत चालले आहेत. काय चाललंय या सरकारमध्ये ? हे तीन रंगाचं हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका…अशी आहे. एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका करण्यासाठी दोन बायका आणि फजिती ऐका, या मराठी चित्रपटाचा आधार घेतला.

एकनाथ शिंदे यांनाही खडसे यांनी सोडले नाही

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या टीकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनाही सोडले नाही. ते म्हणाले, कुणाकुणाचे काय भाग्य फुलते. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो. मुक्ताईनगरचे आमदार 50 कोटी घेऊन ओके होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर ते शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील या सर्वांना एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ खडसे यांचा टीकेचा रोख नेहमी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरमधील त्यांचे राजकीय विरोधक आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर असतो. परंतु गुरुवारी जळगावातील कार्यक्रमात तीन पक्षांच्या महायुती सरकारमधील सर्वच  नेत्यांना त्यांनी घेरले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.