Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटील शेकापच्या पाटलांना चहा देत होते, पण अजितदादांनी थांबवलं! वाचा नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी आपल्या हातातील चहाचा कप शेकापच्या जयंत पाटील यांना आदरपूर्वक घेण्याची विनंती केलं. जयंत पाटील यांनीही तो कप घेण्यासाठी हात पुढे केलेत होते, पण अजित पवार यांनी त्यांना थांबवलं!

जयंत पाटील शेकापच्या पाटलांना चहा देत होते, पण अजितदादांनी थांबवलं! वाचा नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 8:02 PM

मुंबई : बुधवारपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन (winter session) मुंबईत सुरु होतंय. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांशिवायच आज चहापानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सत्ताधारी पक्षातील मंत्री आमदार एकमेकांची भेट घेत होते. त्याच वेळी शेकाप आमदार जयंत पाटील (Jayant Patil) हे राष्ट्रवादी नेत्यांच्या घोळक्यात आले. त्यावेळी चक्क धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेकापच्या जयंत पाटलांना चहाचा कप आणून दिला. नेमकं चहापानावेळी धनंजय मुडे शेकापच्या जयंत पाटलांसाठी चहा आणायला का गेले?

नेमकं काय घडलं?

चहापानादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavhan) तसंच कपिल पाटीलही (Kapil Patil) चहा चर्चा करत होते. याच वेळी नेमके वेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटीलही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यासाठी आले.

…आणि अजित पवारांनी थांबवलं!

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हात जोडून त्यांचं स्वागत केलं. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी आदरपूर्वक शेकापच्या जयंत पाटील यांची विचारपूस केली. हात जोडून शेकापच्या जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी आपल्या हातातील चहाचा कप शेकापच्या जयंत पाटील यांना आदरपूर्वक घेण्याची विनंती केलं. जयंत पाटील यांनीही तो कप घेण्यासाठी हात पुढे केलेत होते, पण अजित पवार यांनी त्यांना थांबवलं!

याप्रसंगी मागेच उभे असलेल्या धनंजय मुंडे हे लगेगच चहाचा कप आणण्यासाठी मागे धावले. क्षणार्धात त्यांनी चहाचा कप शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या आदरपूर्वक दिला. जयंत पाटील यांनीही तो प्रेमानं स्वीकारला. आणि पुन्हा सर्व नेतेमंडळी राजकीय गप्पांमध्ये रंगून गेली.

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या –

Ajit Pawar | आमदारांचं निलंबन त्यावेळची सभागृहातील स्थिती पाहून झालेलं – अजित पवार

चंद्रकांत पाटलांचं राष्ट्रपती राजवटीबाबत वक्तव्य, अजित पवार म्हणतात, धन्य आहोत!

परिक्षेतील घोटाळ्यांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारचं पोलीस खातं सक्षम, CBI कशाला हवं?- Ajit Pawar

Mahadev Jankar on OBC Reservation | ‘छत्रपती शिवाजी महाराजदेखील ओबीसी होते’ – जानकर

'आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष', हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आरपारचा इशारा
'आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष', हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आरपारचा इशारा.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.