निकालाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीत भूकंप, जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते जयदत्त क्षीरसागर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. स्वत: उद्धव ठाकरे जयदत्त क्षीरसागर यांच्या हातातील ‘घड्याळ’ काढून ‘शिवबंधन’ बांधणार आहेत. कोण आहेत […]

निकालाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीत भूकंप, जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश
Follow us
| Updated on: May 22, 2019 | 8:54 AM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते जयदत्त क्षीरसागर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. स्वत: उद्धव ठाकरे जयदत्त क्षीरसागर यांच्या हातातील ‘घड्याळ’ काढून ‘शिवबंधन’ बांधणार आहेत.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

जयदत्त क्षीरसागर हे बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत.

वाचा : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान?

क्षीरसागर कुटुंबात वाद

काका-पुतणे यांचा वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही. ठाकरे घरात पहिली ठिणगी पेटल्यानंतर हा प्रकार दिग्गज नेत्यांच्या घरी सुरु राहिला. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांचं घर फुटलं. त्यानंतर जिल्ह्यात मोठा दुसरा धक्का तो म्हणजे क्षीरसागर घराण्याला बसला. पुतणे संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यावरून घरात वाद पेटला तो अद्याप शमलाच नाही. नाराज पुतणे संदीप क्षीरसागर यांची नाराजी वाढतच गेली आणि काकू नाना आघाडी स्थापन करून खऱ्या अर्थाने संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. पुतण्याला जिल्ह्यातील पक्षातील काही नेत्यांकडूनच जाणिवपूर्वक बळ दिलं जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.