इंग्लंडने टीम इंडियाचा केलेला पराभव हा आंतरराष्ट्रीय कट; आव्हाड म्हणाले, रामजीवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी म्हटल्याने त्यावरून देशभरात पडसाद उमटत आहेत. (ncp leader jitendra awhad slams bjp over andolan jivi comment)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी म्हटल्याने त्यावरून देशभरात पडसाद उमटत आहेत. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर आज इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाचा केलेला पराभव हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचं सांगत रामजीवी म्हणून भाजपची खिल्ली उडवली आहे. (ncp leader jitendra awhad slams bjp over andolan jivi comment)
पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनीही ट्विट करून रिहानाला भारताच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ न करण्याचा सल्ला दिला होता. तसेच रिहानाचं ट्विट हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचं चित्रंही तयार करण्यात आलं होतं. त्यातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणून त्यांची संभावना केली होती. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. आज इंग्लंडने भारताचा पराभव केल्याने त्यावरून उपरोधिक ट्विट करत आव्हाड यांनी भाजची खिल्ली उडवली आहे. ‘आज इंग्लंडकडून झालेला भारताचा पराभव हा भारतीय क्रिकेटला बदनाम करण्यासाठी शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा आहे. रामजीवी’, अशी खोचक टीका आव्हाड यांनी केली आहे.
मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका व्यक्त केली. तसेच देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, अशी शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला होता.
भारताचा पराभव
पाहुण्या इंग्लंडने पेटीएम टेस्ट सीरिजमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारतावर विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने कसोटीतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. तसेच या मालिकेतही 1-0 ने आघाडी घेतली. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे तगडे आव्हान दिले होते. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. फक्त शुबमन गिलने 50 धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची झुंजार खेळी केली. भारताचा जरी पराभव झाला तरी विराटने या अर्धशतकासह बहुमान आपल्या नावे केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. (ncp leader jitendra awhad slams bjp over andolan jivi comment)
आज इंग्लंडकडून झालेला भारताचा पराभव हा भारतीय क्रिकेटला बदनाम करण्यासाठी शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा आहे.
– रामजीवि
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2021
संबंधित बातम्या:
इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव, त्यानंतरही कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ विक्रम
मोदी विरोधकांना म्हणाले, आंदोलनजीवी जमात; राष्ट्रवादीने व्हिडीओतून उडवली भाजपच्या आंदोलनांची खिल्ली
अमित शाह सिंधुदुर्गात आले तेव्हाच धक्का देणार होतो, पण…. विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार
(ncp leader jitendra awhad slams bjp over andolan jivi comment)