कोरोनावर लक्ष देणं महत्त्वाचे, कठीण परिस्थितीत घाणेरडं राजकारण करणं योग्य नाही : जितेंद्र आव्हाड

या कठीण परिस्थितीत राजकारण करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad on BJP MLA joins NCP Again) दिली.

कोरोनावर लक्ष देणं महत्त्वाचे, कठीण परिस्थितीत घाणेरडं राजकारण करणं योग्य नाही : जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 4:01 PM

ठाणे : सध्या कोरोनावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीत राजकारण करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक असल्याचे भाष्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी ही प्रतिक्रिया दिला. (Jitendra Awhad on BJP MLA joins NCP Again)

“कोण येणार, कोण जाणार या चर्चेत मी नाही. मला सध्या कोरोना या विषयावर लक्ष द्यायचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल याकडे लक्ष देणं महत्वाचे आहे. या कठीण परिस्थिती घाणेरडं राजकारण करणं योग्य नाही.” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शुक्रवारी 7 ऑगस्टला एकही रुग्ण आढळला नाही. जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेला मुंब्रा कळवा भाग हॉट्स्पॉट म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र आता या ठिकाणी रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. तसेच ठाण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी मुंब्र्यातील हाच पॅटर्न सर्वांनी फॉलो करावा, असे मत जितेंद्र आव्हाडांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात…

“काही जण राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली होती. (Jitendra Awhad on BJP MLA joins NCP Again)

संबंधित बातम्या : 

पार्थ पवार यांचे ‘जय श्री राम!’, अयोध्येतील राम मंदिर निर्माणाला पत्रातून शुभेच्छा

फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.