Sharad Pawar | पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवार आहेत? हो की नाही? उत्तर नवाब मलिकांनी देऊन टाकलं!

Nawab Malik on Sharad Pawar : नवाब मलिक यांना यावेळी शरद पवार (Sharad Pawar) हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे का? असा सवाल पत्रकारांनी दिला. त्याला नवाब मलिकांनी उत्तर दिलंय. आगामी विधानसभा निवडणुकाच्या पाश्वर्भूमीवर भाजपाल पर्याय देण्यासाठी शरद पवार केल्या अनेक दिवसांपासून काम करत आहेत. काँग्रेससह इतर पक्षांशीही त्यांची चर्चा सातत्यानं सुरु आहे.

Sharad Pawar | पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवार आहेत? हो की नाही? उत्तर नवाब मलिकांनी देऊन टाकलं!
राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 9:48 PM

मुंबई : आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षही सज्ज झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीनं आपली रणनिती ठरवली असून त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकारांसोबत बातचीत केली. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडेलच, असा विश्वास नवाब मलिकांनी व्यक्त केला. दरम्यान, नवाब मलिक यांना शरद पवार (Sharad Pawar) हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यालाही नवाब मलिकांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलंय. आगामी विधानसभा निवडणुकाच्या पाश्वर्भूमीवर भाजपला पर्याय देण्यासाठी शरद पवार गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहेत. काँग्रेससह इतर पक्षांशीही त्यांची चर्चा सातत्यानं सुरु आहे. त्यामुळे पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत की काय? या विषयी पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना पवारांच्या पंतप्रधान बनण्याच्या शक्यतेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ज्याला नवाब मलिकांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेवरुन नवाब मलिकांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान पदाच्या शर्यतीवर काय म्हणाले?

नवाब मलिक यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत शरद पवार नाही, असं स्पष्टपणे म्हटलंय.य शरद पवार हे भाजपला पर्याय देण्यासाठीच्या कामात असून ते त्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न सध्या नाही. सध्याच्या घडीला पर्याय तयार करण्याचं काम सुरु असल्याचंही म्हणत त्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवार नसल्याचं म्हटलंय. दरम्यान, शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, असंही वक्तव्य त्यांनी केलंय.

उत्तर प्रदेशात परीवर्तन अटळ?

दरम्यान, उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींवरही नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्यांसह भाजपच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानं भाजप विरोधी लाट असल्याचं सिद्ध केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणखी जसजशा जवळ येतील, तसतसं अधिकाधिक रंजक गोष्टी पाहायला मिळतील, असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची रणनिती ठरली आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. जागावाटपावरही कोणताही तिढा नसल्यानं त्यांनी म्हटलंय. युपीत भाजपविरोधात लाट असून युपीत परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

‘पोपट चिट्ठी काढणे, आमच्याकडे नाही’

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचाही नवाब मलिक यांनी घेतला. पोपट चिट्ठी काढणे, भविष्य सांगणे, असले प्रकार आम्ही कधीच केले नाही. किती जागा येतील, याचं भाकित आम्ही कधीच वर्तवलं नाही. भाजपच्या नेत्यांनी ज्योषिश सांगितल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होत असलेल्या टीकेवरुनही त्यांनी भाजपच्या नेत्यांना खडेबोल सुनावले. मुख्यमंत्री काम करत आहेत, गरज असेल तेव्हा ते बाहेर पडतील. मात्र मुख्ममंत्र्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर भाजपनं केलेली टीका अयोग्य असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या –

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत पवार, राऊतांचं मोठं भाकित, चंद्रकांतदादा म्हणतात ‘मुख्यमंत्री कधी बाहेर पडणार ते सांगा’!

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात भाजपला अजून मोठे धक्के बसणार? शरद पवारांचा मोठा दावा

Goa Election 2022: गोव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार का? पवार म्हणाले, तर आम्हाला समाधान !

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.