मुंबई: काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही टूलकिटप्रकरणात उडी घेतली आहे. टूलकिटच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी भाजप बनावटगिरी करत असून देशात द्वेष निर्माण करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. (ncp leader nawab malik slams bjp over toolkit issue)
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून ही टीका केली आहे. बनावटगिरी करून… मीडियाला मॅनेज करून… लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करतेय, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
भाजप मीडिया हाऊस निर्माण करतेय तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, दोन्ही टूलकीट खरे आहे का? याचा भाजपने समोर येऊन खुलासा केला पाहिजे. देशभर बनावट लेटरहेड वापरून टूलकीट तयार करण्यात आले आहेत, हे लोकं सांगत आहेत. त्यामुळे भाजपचा फर्जीवाडा समोर आल्याचेही ते म्हणाले.
भाजपने जो फर्जीवाडा करून देशभर घृणा निर्माण करण्यासाठी बनावट लेटरहेडचा वापर केला. त्यावर ट्वीटर इंडियाने मॅन्यूप्लेटेड इंडियाचा टॅग लावला आहे. भाजपकडे याबाबतचे खरी कागदपत्रे असतील तर दुरुस्त करून घ्यायला हवी होती. परंतु उलट ट्विटरवर भाजप सवाल उठवत आहे. खरे कागद असतील तर ते दाखवा नाहीतर होणार्या कारवाईला सामोरे जा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, ट्विटरने टुलकिट प्रकरणी कारवाई करताना संबित पात्रा यांच्या ट्विटला मॅनिप्युलेटेड मीडिया मार्कट केलं आहे. ट्विटर पॉलिसीनुसार एखाद्या ट्विटची माहिती अचूक नसेल आणि उपलब्ध माहितीही चुकीची असेल तर अशा प्रकारचा लेबल लावला जातो. व्हिडीओ, ट्विट, फोटो किंवा इतर कोणत्याही कंटेन्टमध्ये हे लेबल लावले जाते. या आधी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या अनेक ट्विटला हे लेबल लावण्यात आले होते. त्यानंतर ट्रम्प यांचं अकाऊंट कायमस्वरुपी रद्द करण्यात आलं होतं.
दरम्यान, टुलकिटप्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरूच आहेत. भाजपचे सर्व आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा म्हणून काँग्रेसने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना चिठ्ठीही लिहिली आहे. काँग्रेसच्या एनएसयू या विद्यार्थी संघटनेने पात्रांविरोधात केसही दाखल केली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही भाजपवर जोरदार टीका केली होती. (ncp leader nawab malik slams bjp over toolkit issue)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 26 May 2021 https://t.co/WEKXi8NPzg #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2021
संबंधित बातम्या:
दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी
Narada Sting: सीबीआयच्या याचिकेत ममता बॅनर्जींचंही नाव, राज्याबाहेर खटला वर्ग करण्याची मागणी
नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणींवर एफआयआर दाखल करा; काँग्रेसची दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी
(ncp leader nawab malik slams bjp over toolkit issue)