मुंबई : अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही चूक होती तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्तेत का बसवले? आता त्यांना विरोधी पक्षनेते पदी का बसवले? असा थेट सवालच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला. एमईटी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला संबोधित करताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच पुस्तक लिहिलं तर मोठा भूकंप होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
मी या मंचावर का? त्या मंचावर का नाही? हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचं उत्तर मी आज देणार नाही. योग्यवेळी उत्तर देईन. मी विस्ताराने सर्व गोष्टी सांगणार आहे. मी खुलासा करणार आहे. भुजबळांनी संकेत दिला आहेच. इशारा काफी है. धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. कधी ना कधी चर्चा करणार, मी सांगणार, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अजित दादाला बदनाम करण्याचा कट सुरू आहे. ते चुकीचं आहे. जे आरोप करत आहेत त्यांनाही माहीत आहे. 2022मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की झालं होतं. एकनाथ शिंदे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गुवाहाटीला जाणार होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी शरद पवारांना सांगितलं की आम्हाला भाजप सरकारमध्ये जाऊ. नवीन अचानक बॉम्बस्फोट झालेला नाही. दादाने अचानक पिल्लू सोडलं नाही. दादांना सांगितलं शपथविधी घेतली. त्यांनी दादांनी पक्षाविरोधी काम केलं नाही. केलं असतं तर तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते कसं केलं?, असा सवाल पटेल यांनी केला.
मी सौम्य व्यक्ती आहे म्हणून कमी बोलतो. मलाही एक दिवस पुस्तक लिहिणार आहे. ज्या दिवशी मी पुस्तक लिहिलं तर देशाला आणि महाराष्ट्राला बरेच काही समजेल. शरद पवार जिथे तिथे मी होतो. प्रफुल्ल पटेल म्हणजे शरद पवारांची सावली होतो. म्हणून सांगतो, मी या मंचावर आहे. हातपाय जोडून विनंती करतो. आमची भावना समजून घ्या, असं आवाहनही त्यांनी केला.
आमचे भाजपशी वैचारिक मतभेद नव्हते. महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना भाजपसोबत होती. आजपर्यंत सर्वात जास्त शिव्या शरद पवार यांना शिवसेना आणि बाळसाहेब ठाकरे यांनी दिल्या. त्या शिवसेनेला आपण मिठी मारू शकतो तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही? असा सवाल करतानाच आम्ही स्वाभिमानाने युतीत आलो. मेहबूबा मुफ्ती, फारख अब्दुल्ला भाजपसोबत जाऊ शकतात, तर आम्ही का नाही?, असा सवालही त्यांनी केला.