Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांचा बचाव करण्यास असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार नाराज

या संपूर्ण प्रकरणात शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन अनिल देशमुख यांची बाजू मांडली होती. | Sharad Pawar Anil Deshmukh

अनिल देशमुखांचा बचाव करण्यास असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार नाराज
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 12:58 PM

मुंबई: परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर शरद पवार (Sharad Pawar) प्रचंड नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची बाजू व्यवस्थितपणे मांडली नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा डागाळली होती. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज झाले आहेत. (Sharad Pawar is not happy with NCP leaders over Anil Deshmukh matter)

या संपूर्ण प्रकरणात शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन अनिल देशमुख यांची बाजू मांडली होती. परमबीर सिंह यांनी आयुक्तपद गेल्यानंतर हे आरोप केले आहेत. ते दिल्लीत जाऊन आल्यानंतर त्यांनी पत्र लिहले. या एकूण गोष्टी संशयास्पद असल्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, शरद पवार वगळता राष्ट्रवादीचा एकही नेता असा मुद्देसूद प्रतिवाद करु शकला नव्हता. त्यामुळे शरद पवार नेत्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे समजते.

तर दुसरीकडे शरद पवार हे अद्याप अनिल देशमुख यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसत आहे. अनिल देशमुख यांनी न घाबरता सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे, असा सल्ला शरद पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकासआघाडी सरकार आणि अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर असून त्यासाठी स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगत उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला होता. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सीबीआयने परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली आहे. संजय पाटील यांनीच परमबीर सिंह यांना अनिल देशमुखांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याची माहिती दिली होती.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं.

इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अ‍ॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. संबंधित बातम्या :

Anil Deshmukh: सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीत; ‘या’ बड्या वकिलाची भेट

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

अनिल देशमुखप्रकरणात पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव, अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या, भलेही तुम्ही मोठे मराठा नेते असाल

(Sharad Pawar is not happy with NCP leaders over Anil Deshmukh matter)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.