Jitendra Awhad: “संभाषणाची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?” जितेंद्र आव्हाड यांचा मुनगंटीवारांना परखड सवाल

"तुम्ही जर लोकांनी संभाषणाची सुरवात करावी तर कशाने करावी हे पण तुम्हीच सांगणार तुम्हीच शिकवणार का?" असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Jitendra Awhad: संभाषणाची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का? जितेंद्र आव्हाड यांचा मुनगंटीवारांना परखड सवाल
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 10:34 AM

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितलं नाही, त्यांनी आदेश काढला आहे. सांगणं वेगळं असतं आणि आदेश वेगळं असतं! भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराने भारतीय संस्कृती सुरू होते. या संस्करांमधे नमस्कार आहे. कित्येक लोक जयभीम म्हणतात, कित्येक लोक जय हिंद म्हणतात. साधारण पोलिस अधिकारी बोलताना जय हिंद शब्दाने बोलणं सुरू करतात .कोणी सस्रियाकाल म्हणेल कोणी जय भीम म्हणेल. कोणी नमस्कार म्हणेल किंवा कोणी वंदे मातरम् म्हणेल. त्यातून येणाऱ्या भावना महत्वाच्या आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवर यांच्या निर्णयावर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम्  म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतलाय.

हे सुद्धा वाचा

“अशी जोर जबरदस्ती करू नका. हा देश स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, श्वास कुठून कसा घ्यावा तो पण तुम्हीच ठरवणार का? इतकाही भारताचा श्वास गळा घोटण्याचा प्रकार करू नका. मला हॅलोच म्हणायचं आहे. मला जय भीम म्हणायचं आहे. आता ते जबरदस्ती आमच्या कडून म्हणवून पण घेणार की जबरदस्ती जेलमध्ये टाकणार. पोलिसांकडून केस टाकणार कायदा मोडला म्हणून 353?”, असंही आव्हाड म्हणालेत.

“इथे मिठाला लागलेल्या करा वरती लाखो लोक रस्त्यावर आले असा हा भारत आहे, त्याची पण आठवण ठेवा. हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांनी 1942 मधे छोडो भारतचा नारा दिला आणि हजारो लोक रस्त्यावर झोपले. गोळ्या खाल्ल्या. रक्त सांडलं. पण मागे हटले नाहीत. आपला जी उद्देश आहे तो सोडला नाही”, असंही आव्हाडांनी म्हटलंय.

“उगाचच भारतीय राज्य घटनेने दिलेले स्वातंत्र्य तुमच्या हाताने गळा घोटू नका. कोणालाही ते आवडत नाही. कोणी काय खावं कोणी काय घालावं आता कोणी काय बोलावं हे पण तुम्ही ठरवणार का?”, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.