नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागणार? मुख्यमंत्री-पवारांची मोठी बैठक, काय काय घडतंय?

| Updated on: Feb 23, 2022 | 4:21 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती कळतेय.

नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागणार? मुख्यमंत्री-पवारांची मोठी बैठक, काय काय घडतंय?
पवारांचं बैठकसत्र सुरू
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती कळतेय. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ईडीनं नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील माहिती दिली असल्याचं कळतंय. ईडीनं अटक केली असल्यानं नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रकरणी अटक झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळं नवाब मलिक यांचा राजीनामा स्वीकारला जाणार का? दुसऱ्या कोणत्या नेत्याकडे पदाचा कार्यभार दिला जाणार हे पाहावं लागणार आहे.

हे प्रकरण दाऊदशी संबंधित व्यक्तींसदर्भात असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. नवाब मलिक आता मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता  आहे.

वर्षावर बैठकीचं आयोजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे बैठक होणार आहे.  मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं कळतंय.

शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शरद  पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजीनामा घेतला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जातीय.

मविआच्या तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा ठरणार?

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. शिवसेना मंत्री संजय राठोड यांना एका प्रकरणात राजीमाना द्यावा लागला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर अटक करण्यात आल्यानं राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळं आता नवाब मलिक यांना देखील राजीनाम द्यावा लागण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा: चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. राजीनामा नाही घेतला तर आंदोलन करु असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

इतर बातम्या:

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

Nawab Malik Arrested LIVE Updates : नवाब मलिक यांना PMLA कोर्टात हजर करण्यात येणार