Ncp mla disqualification case | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाणार?

Ncp mla disqualification case | शिवसेनेसारखच हे प्रकरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला होता.

Ncp mla disqualification case | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाणार?
ajit pawar and sharad pawar
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 10:23 AM

मुंबई : नुकताच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. सुनावणीत त्यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट कोणाच्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही. शिंदे गटाला त्यांनी अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा आधार घेतला. आता राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच अपात्रता प्रकरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मागच्यावर्षी फूट पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले. शरद पवार गट विरोधी बाकांवर बसतो, तर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. शिवसेनेसारखच हे प्रकरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

आता माहिती अशी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रात प्रकरणाच्या सुनावणीसाठी विधीमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद होणार आहे. महाराष्ट्रात 27 ते 29 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती व सचिव या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

सुनावणी घेणं कठीण?

परिषदेच्या तयारीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य शासकीय व महापालिकेचे बडे अधिकारी बैठकीला हजेरी लावणार आहेत. विधीमंडळात पार पडणाऱ्या परिषदेमुळे 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणं कठीण आहे. विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीसाठी लवकरच अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.