‘बंद मुठी लाख की खुल गई तो खाक की’, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांना मोठा इशारा

"कुणी कुणी अग्रवालसाठी फोन केले होते? महाराष्ट्रातील लोकांना कळत आहे की, हे आरोप कोणावर आहेत. कुणी फोन केला असेल? जो माणूस उघडपणे सांगू शकतो मोक्कामधील आरोपीला सोडवलं. त्याच्यासाठी अग्रवाल ही किरकोळ गोष्ट आहे", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'बंद मुठी लाख की खुल गई तो खाक की', जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांना मोठा इशारा
जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 8:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पुणे अपघाताच्या घटनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना सूचक इशारा दिला आहे. “अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात किती सख्य होतं हे सगळ्यांना माहिती आहे. पूर्वीचा इतिहास काढून संदर्भ काढून शरद पवार यांना निष्कारण वादात ओढलं जात आहे. जयंत पाटील, छगन भुजबळ, आर आर पाटलांबद्दल अजित पवारांचं काय मत होतं? अनेक वेळा खासगी चर्चेत बोलले आहात. नको त्या गोष्टी उकरून काढायला नको. त्या रस्त्याला जायची मला गरज मला वाटत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“प्रफुल्ल पटेल दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत चर्चा करायचे. 2004 साली काय घडलं हे प्रफुल्ल पटेलांना चांगलं माहिती आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल चर्चा करायचे. ज्येष्ठ मंत्रिमंडळात असताना एकाला मुख्यमंत्रीपद देवून नाराजी पत्कारण सोपं होतं का? राष्ट्रवादी जन्मून त्यावेळी नुकतेच पाच वर्षे झाले होते. मुख्यमंत्री पदापर्यंत हा पक्ष नेवून ठेवला. जुने विषय काढून त्यांना दुर्गंधी परसवणं चांगलं नाही”, असं जितेंद्र आव्हाड अजित पवार गटाला उद्देशून म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांचा इशारा काय?

“अजित पवारांना गृहमंत्री या पदाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. अजित पवारांना कशामुळे त्यांना या पदापासून लांब ठेवण्यात आलं मला माहिती नाही. अग्रवाल प्रकरण असो, पुण्यातील शरद मोहोळ हत्या असो, ते इंदापूरमधील हत्या असो, पुण्यात झालेलं असलेले गँगवाँर असो, आपण पुण्याचे पालकमंत्री असताना हे घडत असताना ते का बोलत नाहीत? अग्रवाल हे प्रकरण इतकं गंभीर आहे त्यांच्यावर ते बोलताना दिसत नाहीत”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“ब्रम्हा कंस्ट्रक्शनचे संबंध कोणाशी आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील ऑफीस विकत घेण्याचा दबाव टाकून काढून घेण्याचा प्रयत्न कोणामुळे कुठे आणि कसा झाला? अग्रवालचा कसा समावेश आणि सहभाग होता? आपल्या कुठल्या साथीदारांचे प्रयत्न होते? आपल्या साथीदारानं काय सांगितलं? किती रक्कम आणू देतो असं सांगितलं होतं? बंद मुठी लाख की खुल गई तो खाक की”, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिला. “जे शांत झालं ते शांत राहू द्या. नको तिथे चिमटे काढण्याचा प्रयत्न करू नका. जे शांत झाले ते शांत राहू द्या ना”, असाही इशारा त्यांनी दिला.

आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

“तुमचे लाडके मंत्री धनंजय मुंडे कुठे गेले का? यावर भाष्य केलं नाही. दुष्काळ परिस्थिती गंभीर असताना कृषीमंत्री गैरहजर कसा राहिला, हे विचारणं चुकीचं आहे का? दहा हजार टँकर सध्या विविध जिल्ह्यात आहेत. कृषीमंत्री विचारून गेले आहेत का? ते जिथे असतील तिथून महाराष्ट्रावर नजर ठेवून असतील? कृषीमंत्र्यांचं उत्तरदायित्व महाराष्ट्राशी आहे. तुमचे लाडके कुठे गेले कधी गेले माहिती नाही. धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राशी लाड करावेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

आव्हाडांचा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली. “कोकण पट्यातील मुस्लिमांनी तुम्हाला दार बंद करून प्रवेश नाकारला, त्यांचा राग शरद पवारांवर काढता. शरद पवारांनी कुणाशी बैठक घेतली ते जाहीर करा. कर्नाटकच्या निवडणुकीत हेचं घडलं. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीतही हेच घडलं. मत दिली नाहीत ती पवारांमुळे दिली नाहीत हे बोलायला तुम्ही मोकळे. बस करा आता, पवार पुराण बंद करा. पंचपक्वानाच्या ताटावरूव बसून सह्या करत होते. आता पत्रावळीवर बसले आहात”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.