राज्य कोरोनाशी लढतंय, भाजपला राजकारणाचं पडलंय, रोहित पवार संतापले

'आज एकीकडे भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे' अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. (Rohit Pawar angry on BJP Politics amid corona)

राज्य कोरोनाशी लढतंय, भाजपला राजकारणाचं पडलंय, रोहित पवार संतापले
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 5:13 PM

मुंबई : ‘कोरोना’च्या संकटकाळात विरोधकांनी एकजूट दाखवावी आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट किंवा उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीविरोधात हायकोर्टात दाखल झालेली याचिका, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे. (Rohit Pawar angry on BJP Politics amid corona)

‘राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलं आहे. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात, तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा!’ असा सल्ला रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिला आहे.

‘आज एकीकडे भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे’ अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

(Rohit Pawar angry on BJP Politics amid corona)

उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. राज्यपालांना याबाबतचे अधिकार असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. ‘राज्यपालांना निर्णय घेऊ द्या. सध्या नियुक्तीत हस्तक्षेप करणं अयोग्य आहे. हस्तक्षेपामुळे राज्यपालांना स्वतंत्रपणे निर्णय घेता येणार नाही. याचिकेतल्या मागण्या सध्या अपरिपक्व वाटत आहेत’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांची नियुक्ती रोखण्याची विनंती करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली होती.

उद्धव ठाकरे यांना विधिमंडळात राज्यपाल नियुक्त सदस्यत्व देण्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. आधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियमाकडे बोट दाखवलं होतं, त्याला राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिलं होतं.

हेही वाचा : दिवे पेटवण्यामागील मोदींच्या हेतूचं स्वागतच करायला हवं, रोहित पवार यांचा पाठिंबा

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सकाळी राज्यपालांच्या भेटीला राजभवनात गेले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यपालांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. राजभवन हा राजकाराणाचा अड्डा होऊ नये, अशी टीका राऊतांनी केली होती. या टीकेला आधी भाजप आमदार आशिष शेलार आणि नंतर खासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट

मी गिरणी कामगाराचा मुलगा, रणांगणात उतरलो तर महागात पडेल, चंद्रकांत पाटलांचा विश्वजीत कदमांना इशारा

जो शिशों के घरो मे रहते है… जयंत पाटील-चंद्रकांतदादांच्या वादात विश्वजित कदमांची उडी

(Rohit Pawar angry on BJP Politics amid corona)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.