प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवार यांच्या वक्तव्यावर रोहित पवार काय म्हणाले?

"पुढच्या दोन वर्षात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेस पक्षात विलीन होण्याबाबत विचार करतील", असं वक्तव्य शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर आता रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवार यांच्या वक्तव्यावर रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार आणि शरद पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 7:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत एक मोठं वक्तव्य केलं. पुढच्या दोन वर्षात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेस पक्षात विलीन होण्याबाबत विचार करतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यांच्या स्वत:चा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल का? असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत भाष्य करु, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. पण शरद पवार यांच्या याबाबतच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत विविध चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित पवारांनी भूमिका मांडली.

“शरद पवार यांचा वेगळा आणि मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्याबाबतीत जास्त स्पष्टपणे बोलू शकत नाही. मी ऐकलेले नाही आणि अभ्यासही केलेला नाही. त्यामुळे मी बोलू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसला राज्यघटना कळत नाही. त्यांना राज्यघटनेत काय लिहिले आहे ते कळत नसेल की कश्या पद्धतीने आरक्षण दिले गेले तर मत मागण्यासाठी समाजा मध्ये द्वेष बंद करा, राज्य घटना कळत नसेल तर बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर लोकांची दिशाभूल करू नये”, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

“भाजपने रेमडेसिवीर बनविणाऱ्या एका कंपनीकडून निधी घेतला. त्या गुजरातच्या कंपनीला परवानगी मिळत नव्हती. मात्र निधी आला आणि रेमडेसिवीरला परवानगी मिळाली. असं बोललं जातंय की, त्यामुळे अनेकांचे प्राण गेले. त्यामुळे काँग्रेसवर आरोप करण्यापेक्षा मोदींनी भाजपालाच विचारले पाहिजे ते पैसे कुठून आले? खरंतर तो भ्रष्टाचार 16 हजार कोटींचा नसून लाखों कोटींचा भ्रष्टाचार झालाय”, असा आरोप रोहित पवारांनी केला.

मोदींच्या एक्सपायरी डेट टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर आरोप करत 4 जून नंतर इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट होईल, अशी टीका केली होती. त्यावर रोहित पवारांनी उत्तर दिलं की, “दक्षिण अहमदनगरचे उमेदवार विखे पाटील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा एक्सपायरी डेट ही 4 जूनलाच असणार आहे.”

रोहित पवार आरक्षणावर काय म्हणाले?

“काँग्रेस आली तर ओबीसींसह सर्वांचे आरक्षण जाईल, असे पंतप्रधान आरोप करत आहेत. यावर रोहित पवारांनी सांगितलं की, भाजपाच्या एकही खासदाराने मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणाचा मुद्दा कधी मांडला का? आज ओबीसींवर बोलताय, त्यांनी ओबीसीवाल्यांचा फॉरेस्ट अॅक्ट का काढला? आदिवासी ज्या ठिकाणी राहतात तेथील गौण खनिज मोठ्या कंपनीला देता यावे म्हणून अधिकार काढून घेण्यात आला. मनीपूरमध्ये भांडणं लावली. कारण तेथील खनिज कंपनीला द्यायचं होतं. म्हणून त्यांनी भांडण लावली. आज मराठा आरक्षण सदावर्तेंच्या आडून आडवलं. ओबीसी आडवलं, धनगर आडवलं. त्यामुळे त्यांनीच हा खेळ केलेला आहे”, असा आरोप रोहित पवारांनी केला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.