शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मला न्याय द्यावा, विद्या चव्हाणांच्या सुनेची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मला न्याय द्यावा, अशी विनंती विद्या चव्हाण यांच्या सुनेने केली (Vidya Chavan daughter in law Issue) आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मला न्याय द्यावा, विद्या चव्हाणांच्या सुनेची विनंती
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 10:36 PM

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मला न्याय द्यावा,” अशी विनंती विद्या चव्हाण यांच्या सुनेने केली (Vidya Chavan daughter in law Issue) आहे. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातवाच्या जन्मासाठी सासरी छळ होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सूनेने केला आहे.

“शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मला न्याय मिळावा यासाठी (Vidya Chavan daughter in law Issue) मदत करावी. मला माझ्या मुलीपासून तोडलं आहे. मला माझी मुलगी परत हवी. मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही. विद्या चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर कारवाई केली जावी. ही माझी विनंती आहे. मला न्याय मिळावा यासाठी मदत करा,” अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांच्या सुनेने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

“माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीची जिच्यामागे कोणतेही राजकीय पाठबळ नाही. माझ्यापाठी ना सीएम, ना आमदार आहे. अशा मुलीची कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल होतं आहे. तर यात काही तरी सत्य आहे, पुरावे आहेत, म्हणूनच होत आहे,” असेही त्या म्हणाल्या

“त्या स्वत: आज महिलांसाठी झटतात. मी एक स्त्री आणि आई आहे. माझे चारित्र्यावर संशय घ्यायचा हक्क यांना कोणी दिला. फक्त राजकीय बळ आहे म्हणून या असं सगळं करतात.” असा आरोप त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईतील विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातवाच्या जन्मासाठी सासरी छळ होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सूनेने केला आहे. Vidya Chavan allegations on daughter in law

विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत चव्हाण, मुलगा अजित (तक्रारदार सूनेचा पती) दुसरा मुलगा आनंद आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने आपला छळ करण्यात येत होता, असा दावाही सूनेने केला आहे.

तक्रारदार सूनेला पहिली मुलगी आहे. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मात्र मुदतीआधीच प्रसुती झाल्याने बाळ दगावलं. त्यानंतर माझ्या छळात वाढ झाली, अशी तक्रार सूनेने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सूनेचे विवाहबाह्य संबंध, आमदार विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप

विद्या चव्हाणांच्या सूनेने 16 जानेवारीला विलेपार्ले पोलिस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कलम 498 अ, 354, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

विद्या चव्हाणांच्या सूनेने 16 जानेवारीला विलेपार्ले पोलिस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कलम 498 अ, 354, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नातवासाठी छळल्याचा सूनेचा आरोप, आमदार विद्या चव्हाणांवर गुन्हा

विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेवरील आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्या दिंडोशी मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला.

विद्या चव्हाण अनेक चर्चांमध्ये राष्ट्रवादीची बाजू खंबीरपणे मांडतात. महिलांच्या मुद्दयावर कळकळीने बोलणाऱ्या विद्या चव्हाणांवरच सूनेच्या छळाचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. (Vidya Chavan daughter in law Issue)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.