Shiv Sena : राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिवसेनेत, पक्षाची ताकद अन् पक्षप्रमुखांचा आत्मविश्वासही वाढला

शिवसेना पक्ष आपलाच हे दाखवून देण्यासाठी आता पक्षाकडून सदस्य नोंदणी सुरु आहे. एक लढाई कोर्टात तर दुसरीकडे रस्त्यावर असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसादही मिळत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत 1 लाखाहून अधिकची नोंदणी झाली आहे. सदस्य नोंदणीचा फॉर्म आणि सर्वकाही सुरळीत प्रकिया करण्याचे आवाहन ठाकरे यांच्याकडून केले जात आहे.

Shiv Sena : राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिवसेनेत, पक्षाची ताकद अन् पक्षप्रमुखांचा आत्मविश्वासही वाढला
जिंकणारच, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 3:27 PM

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर (Shivsena Party) शिवसेनेतून आऊटगोइंग आणि शिंदे गटात इनकमिंग असेच चित्र राहिलेले आहे. शिवसेनेच्या खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. आता कुठं हे चित्र थांबले आहे. पक्ष अडचणीत असतानाच आता नाशकात मात्र दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू (Bharat Kokate) भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे सदस्य नोंदणीला वाढता प्रतिसाद आणि दुसरीकडे पक्षामध्ये होत असलेले प्रवेश यामुळे शिवसेनेची तर ताकद वाढणार आहेच पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वासही वाढत असल्याचे कोकाटे यांच्या प्रवेशा दरम्यान दिसून आले आहे.

कार्यकर्त्यांसह कोकाटे शिवसेनेत

राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आता हातामध्ये शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. तर शिवसैनिकावर माझा विश्वास असून येथून पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ते ही मर्दासारखी म्हणत त्यांनी बंडखोर आमदांवर टिका केली. प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की भविष्यात शिवसेनेच्या नांदी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असे म्हणत शिवसेनेचा भगवा कुणालाही हिसकावू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नाशिकमध्ये 1 लाखाहून अधिक सदस्य नोंदणी

शिवसेना पक्ष आपलाच हे दाखवून देण्यासाठी आता पक्षाकडून सदस्य नोंदणी सुरु आहे. एक लढाई कोर्टात तर दुसरीकडे रस्त्यावर असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसादही मिळत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत 1 लाखाहून अधिकची नोंदणी झाली आहे. सदस्य नोंदणीचा फॉर्म आणि सर्वकाही सुरळीत प्रकिया करण्याचे आवाहन ठाकरे यांच्याकडून केले जात आहे. पुन्हा केवळ फोटोच कसा म्हणून आपले सदस्य रद्द होऊ नये याची काळजी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

सदस्य नोंदणीवरुन शिंदे गटावरही टिकास्त्र

सध्या शिवसेना आणि शिंदे गटाकडूनही सदस्य नोंदणी ही सुरु आहे. पण शिवसेना पक्षाची नोंदणी ही थेट शिवसैनिकापर्यंत जाऊन केली जात आहे तर काहींनी यासाठी प्रोफशनल एजंट लावल्याची टिका ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा दसपटीने सदस्य संख्या करणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रवेशादरम्यान कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. आता सदस्य संख्या कोणाची जास्त यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत स्पर्धा पाहवयास मिळत आहे.

संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.