पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका, अमोल कोल्हेंचा हुंकार

शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका, अमोल कोल्हेंचा हुंकार
अजित पवार, शरद पवार आणि अमोल कोलहे
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 9:35 AM

पुणे : खासदार अमोल कोल्हे सभा गाजविणारे वक्ते नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. कुठलाही मुलाहिजा न बाळगता आपल्या मनातील भावना ते व्यक्त करत असतात. अनेकवेळा राजकीय फटकेबाजीच्या माध्यमातून ते विरोधकांवर तसंच स्वपक्षीयांनाही डोस पाजत असतात. भोसरीमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोल्हेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

आपणाला शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पहायचे असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालावायला लागू नये अशी माझी भावना असल्याचे मत शिरूर चे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. भोसरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार 13 ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 तारखेला मेळावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी स्थानिक नेत्यांना कानपिचक्या दिल्या. अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर इथल्या नेत्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता इथे ताकत वाढवली पाहिजे, असंही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पिंपरी-चिंचवड शहराची ओळख होती. पिंपरी-चिंचवड शहरावर वर्षानुवर्षे पवारांनी सत्ता गाजवली. मात्र, महापालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला अन् भाकरी फिरवली. आता भाजपच्या हातून ही सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: रिंगणात उतरले आहेत. 13 ऑक्टोबर रोजी शरद पवार माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 ऑक्टोबरला पवारांच्या उपस्थित मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नावलौकिक आहे. हे देशातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा शरद पवारांचा राहिला आहे. पूर्वी हा लोकसभेचा बारामती मतदार संघाचा भाग होता. आपल्या निवडणूक प्रचाराचा नारळ पवार पिंपरी-चिंचवड मध्येच फोडायचे. पण 2017 च्या निवडणूकीत पिंपरी-चिंचवडकरांनी आपला कारभारी बदलला. अर्थात राष्ट्रवादीतल्या काही फुटीर नेत्यांमुळेच भाजपला पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवणं शक्य झालं.

जुने नेते शरद पवारांच्या भेटीला

शरद पवार देशाच्या राजकारणात सक्रिय झाल्यावर अजित पवार यांच्याकडे या शहराची सूत्र आली. अजित पवारांनीहीआपल्या कामाची छाप विकासकामांच्या माध्यमातून उमटवली. या काळात अनेक जुनेजाणते नाराज झाले. 2017 च्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपशी घरोबा केला. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांना दिलेल्या उमेदवारीवरुन अनेक जण नाराज झाले. अनेकांमध्ये आपल्याला डावल्याची भावना निर्माण झाली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यापैकीच काहीजणांनी आता शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसंच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरात लक्ष घालण्याच साकडं घातलं आहे. तशी माहिती माजी आमदार विलास लांडे यांनी दिलीय.

कोणत्या नेत्यांचं शरद पवारांना साकडं?

शरद पवारांची भेट घेणाऱ्यांमध्ये आझमभाई पानसरे, विलास लांडे, श्रीरंग शिंदे, शाम वाल्हेकर यांच्यासह विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचाही समावेश होता. शहरात पक्ष संघटना मजबूत करण्यात या सर्वांच मोठं योगदान असलं तरी सध्या त्यांच्यात नाराजीही आहे. काहींची नाराजी अजित पवारांच्या कार्य पध्दतीवर आहे. तर काहींना शहराचा कारभार पार्थ पवारांच्या हातात गेल्यावर आपलं काय? याचीही चिंता सतावत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

शरद पवार कोणते डावपेच टाकणार?

मावळमधील पराभवानंतर आता पार्थ पवार यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराची सूत्र जाण्याची चर्चा आहे. अशावेळी जुने नेते मात्र परत शरद पवारांकडे गेले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटातटाच राजकारण समोर आलंय. दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी 3 सदस्यीय प्रभाग झाल्यावर राष्ट्रवादीमधील अनेकांची झोप उडाली आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अन गटातटाचं राजकारण मोडून काढण्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी पवार कोणता डाव टाकणार याकडे सत्ताधारी भाजपसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

(NCP MP Amol Kolhe idea to NCP Karyakarta to make Sharad Pawar Prime Minister and Ajit Pawar Chief Minister)

हे ही वाचा :

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.