मांत्रिकाच्या घरावर कोण बाहुली बांधणार? महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार

कोल्हापूर : मांत्रिकाच्या घरावर कोण बाहुली बांधणार? असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर केला आहे. स्वतःच घरासमोर बाहुली बांधून ती आम्ही बांधली असे सांगण्यात येते. मात्र मांत्रिकाच्या घरावर कोण बाहुली बांधणार? असा सवाल खासदार महाडिक यांनी केला आहे. त्यांनी (सतेज पाटील) जादूटोण्यापेक्षा विकासावर बोलावे, असा टोलाही यावेळी महाडिक […]

मांत्रिकाच्या घरावर कोण बाहुली बांधणार? महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

कोल्हापूर : मांत्रिकाच्या घरावर कोण बाहुली बांधणार? असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर केला आहे. स्वतःच घरासमोर बाहुली बांधून ती आम्ही बांधली असे सांगण्यात येते. मात्र मांत्रिकाच्या घरावर कोण बाहुली बांधणार? असा सवाल खासदार महाडिक यांनी केला आहे. त्यांनी (सतेज पाटील) जादूटोण्यापेक्षा विकासावर बोलावे, असा टोलाही यावेळी महाडिक यांनी सतेज पाटलांचे नाव न घेता लगावला.

अमावस्येच्या रात्री सतेज पाटलांच्या घराबाहेर काळी बाहुली

आमदार सतेज पाटील  यांच्या घरासमोर आठवड्यात दोनवेळा काळी बाहुली बांधल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर याची चर्चा राज्यभर सुरु झाली. “आम्हाला जादूटोणा करण्याची सवय नाही. ते स्वतःच इतरांवर जादूटोणा करण्यापेक्षा विकासावर बोलावे.” असंही धनंजय महाडिक म्हणाले. ते चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते.

नेमकं प्रकरण काय आहे?

कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भानामतीचा प्रकार घडल्याचं समोर आला होता. बावडा येथील राहत्या घरासमोर काही झाडं आहेत. यापैकी एका झाडाला काळी बाहुली दोऱ्यानं बांधून ठेवल्याचं पाहायला मिळालं. गेल्या आठ दिवसांमध्ये असा प्रकार दोन वेळा घडला आहे.

सतेज पाटील यांच्या कसबा बवड्यातील ‘यशवंत’ या निवासस्थानी अमावस्येच्या रात्री अज्ञाताने हे कृत्य केलं. पांढऱ्या कपड्यात गुंडाळून काळी बाहुली झाडाला टांगण्यात आल्याचा  प्रकार उघडकीस आला. त्यामुळं आमदार सतेज पाटील यांच्या घरासमोर घडलेल्या प्रकाराची चर्चा शहरात सुरु झाली आहे. ही बाहुली नेमकी कुणी बांधली,त्यामागे काय उद्देश होता, याला निवडणुकीचा काही संदर्भ आहे का? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र सतेज पाटील यांच्या घराच्या संरक्षण भिंतीवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरु झालं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.