झेपत नसेल तर राजीनामा द्या, पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या
आंबिल ओढ्यावरील (Ambil Odha Pune) घरांवर पुणे महापालिकेने (Pune Municipal corporation) केलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पुणे : आंबिल ओढ्यावरील (Ambil Odha Pune) घरांवर पुणे महापालिकेने (Pune Municipal corporation) केलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या. “पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (NCP MP Supriya Sule demands resignation of Pune Mayor Murlidhar Mohol after action on Ambil Odha)
यंत्रणांचा वापर विरोधकांसाठी
सुप्रिया सुळे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या छापेमारीवरुनही भाष्य केलं. “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. पवरा साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र नवी नियमावली यांनी काढली आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे जाणून बुजून केलं जातं. एखादा मोठा पक्ष देशात एव्हढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आमचं प्रगतीचं राजकारण
आमचं राजकारण हे प्रगतीचं राजकारण आहे. आम्ही लोकांची सेवा करण्यात व्यस्थ आहोत. तिसरी लाट कधी येईल याची चर्चा होईल. आता 24 तास महाविकास आघाडी तिसरी लाट रोखण्यात, त्याच्या उपाय योजनांमध्ये व्यस्थ आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
Special Report | पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद; कारवाई नेमकी केली कुणी, बिल्डर की महापालिका?
आंबिल ओढा परिसरातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश