Supriya Sule : ‘त्या’ 105 आमदारांमध्ये 50 आमचे आहेत हे लक्षात ठेवा; सुप्रिया सुळेंचा भाजपला सूचक इशारा

Supriya Sule :पैसे देऊन जाणारे आहेत. त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावा, असे देशातील लोकांना वाटत आहे, याकडेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

Supriya Sule : 'त्या' 105 आमदारांमध्ये 50 आमचे आहेत हे लक्षात ठेवा; सुप्रिया सुळेंचा भाजपला सूचक इशारा
सुप्रिया सुळेंचा भाजपला सूचक इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 5:21 PM

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलेच फटकारे लगावले आहेत. निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी शरद पवारांना (sharad pawar) जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही 105 असल्याचे बोलत आहेत, त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले 50 आहेत हे लक्षात ठेवा, असे सूचक विधान खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी केले. आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. काय करायचं असं जेव्हा साहेबांना विचारते त्यावेळी पवारसाहेब पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

पैसे देऊन जाणारे आहेत. त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावा, असे देशातील लोकांना वाटत आहे, याकडेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. नवाबभाई यांनी दिल्लीला अक्षरशः हलवून सोडलं होतं. मोठा फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई झाली. हा एकप्रकारे अन्याय झाला, असं त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

दादा-पाटील यांनी एकत्र दौरा केला तर बदल होईल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवारांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे 2024 मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, निरीक्षकांनी आपली मते, विचार व्यासपीठावर मांडली.

कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल

यावेळी राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार बॅटिंग केली. बाहेर काय पाऊस.. काय वारा पण सगळे आले बघा.. ओक्केमध्ये आहे, अशी भाषणाची सुरुवात करत छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

जातीय जनगणना करा

आडनावावरून नोंदणी करु नका तरी केली गेली. ठाण्यात दहा टक्के ओबीसी दाखवले आहेत. ओबीसी 54 टक्के आहेत. त्यामुळे जातीय जनगणना करा. निवडणूकीसाठी आपल्याला तयार रहावे लागणार आहे यावरच पुढच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या निवडणूका आहेत, असं भुजबळ म्हणाले. .

शायरीतून झापले

आता आपण विरोधात आहोत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याविरोधात आपण ठामपणे उभे राहायला हवे. ‘गलत का विरोध खुलकर किजीए, राजनीती हो या समाजनीती, इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है तलवे चाटनेवालों का नही’ असा टोलाच भुजबळ यांनी शायरीतून लगावला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.