AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांची नाव जवळपास निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगेंना संधी दिल्याची माहिती आहे. (NCP nominates Eknath Khadase, Raju Shetti, Yashpal Bhinge, Anand Shinde)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांची नाव जवळपास निश्चित
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 7:08 PM

मुंबई: विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगेंना संधी दिल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना सहकार आणि समाजसेवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सहकार आणि सेवा, गायक आनंद शिंदे यांना कला आणि यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे.  (NCP nominates Eknath Khadase, Raju Shetti, Yashpal Bhinge, Anand Shinde)

आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. त्यानंतर या तिघांनीही राज्यपालांशी काहीवेळ चर्चा केली.

आनंद शिंदे हे प्रसिद्ध गायक असून महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ते दलित समाजातून आले आहेत. विशेषत: ते रिपब्लिकन चळवळीतही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन दलितांची मते वळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे मानले जातेय. राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने मोठी राजकीय शक्ती निर्माण केली आहे. त्यामुळे वंचितची ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचा उपयोग करून घेण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल असं बोललं जात आहे.

यशपाल भिंगे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध लढवली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे.

Breaking | राज्यपाल नियुक्त विधान परिषदतेच्या सदस्यांची नावे आज सादर होणार

शिफारस केलेल्या व्यक्तींची नावं सादर करा; राज्यपाल नियुक्त संभाव्य सदस्यांविरोधात कोर्टात याचिका

(NCP nominates Eknath Khadase, Raju Shetti, Yashpal Bhinge, Anand Shinde)

पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.