Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं औरंगाबाद नामांतरावर सूचक वक्तव्य

सध्या राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय चांगलाच तापलेला आहे. त्यावरुन अगदी महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये देखील मतभेद असल्याचं दिसत आहे.

संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं औरंगाबाद नामांतरावर सूचक वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 5:46 PM

अहमदनगर : सध्या राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय चांगलाच तापलेला आहे. त्यावरुन अगदी महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये देखील मतभेद असल्याचं दिसत आहे. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय‌मंत्री प्रफुल पटेल यांनी देखील यावर सूचक वक्तव्य केलं आहे. संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय आहे, असं म्हणत त्यांनी हा विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजेंड्यावरील विषय नाही, असं स्पष्ट केलंय. ते आज (9 जानेवारी) साई दर्शनासाठी शिर्डीत आले. त्यावेळी त्यांनी ही मतं व्यक्त केली (NCP senior leader comment on Aurangabad Sambhajinagar and Shivsena).

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. तो शिवसेनेचा विषय आहे. जेव्हा शासनाचा विषय येईल, तेव्हा तिन्ही पक्षांची समन्वय समितीत चर्चा होईल. समन्वय समितीत तिन्ही पक्षांचे दोन दोन ज्येष्ठ मंत्री आहेत. तात्विक निर्णयानंतर मंत्रीमंडळापुढे विषय ठेवण्यात येतात. इतक्या लवकर भाष्य करणं उचित नाही. कारण नामकरणाचा विषय अद्याप समन्वय समितीकडे गेलेला नाही. पुन्हा त्यावर कँबिनेटमध्ये चर्चा होईल. यात घाईने भाष्य‌ करणं योग्य नाही.”

“भंडारा येथील घटना खुपच दुर्दैवी आहे. त्यांच्याबद्दल दुःख असून या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. अशा घटना वारंवार का घडतात? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. याकडे गंभीरतेने लक्ष देत अशा घटना होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः या ठिकाणी भेट देणार असून ते चौकशीचेही आदेश देतील.”

“नेमका निष्काळजीपणा का झाला याबाबत चौकशी व्हायला हवी. राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने अशा घटना गांभिर्याने घेत सक्तीने कारवाई करावी. राज्यातील संपूर्ण शासकीय रुग्णालयांमध्ये असा प्रकार घडू नये यासाठी सक्तीने स्थानिक प्रशासनाला आदेश द्यावेत,” असंही त्यांनी म्हटलं.

‘जगात दर कमी, पण भारतात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात सतत वाढ’

प्रफुल पटेल म्हणाले, “पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर सतत वाढत आहेत. जगात गॅसचे भाव कमी होत असताना भारतात वाढत आहेत. दरवाढ मागे घ्यायला हवी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जसे दर आहेत तसेच ग्राहकाला असले पाहिजेत, ही राष्ट्रवादीची‌ भूमिका आहे.”

हेही वाचा :

ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात; प्रफुल्ल पटेल यांचा टोला

खडसेंच्या पक्षांतरावेळीच प्रफुल पटेलांच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीला रामराम

NCP senior leader comment on Aurangabad Sambhajinagar and Shivsena

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.