NCP : उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी आतापासून आव्हान म्हणून समोर उभी राहणार, वाचा सविस्तर…
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसांसमोर राष्ट्रवादी आतापासून आव्हान म्हणून उभी राहणार- तपासे
मुंबई : एकनाथ शिंदेंचं (Ekanath Shinde) बंड. उद्धव ठाकरेंचा राजीनामा, अश्या बऱ्याच राजकीय घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पण आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपसमोर राष्ट्रवादीचं (NCP) आव्हान असणार आहे. “शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं पाप भाजपने केलं हे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी कधीच विसरणार नाही. आजपासून राष्ट्रवादी भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार”, असा इशारा राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आला आहे. मुंबईत आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंकडून भूमिका जाहीर करण्यात आली. आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शिलेदारांसह पुन्हा मैदानात उतरली असून येणाऱ्या निवडणुकीत भाजपविरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे, असं तपासे म्हणाले आहेत.
आजपासून भाजपसमोर राष्ट्रवादीचं आव्हान
आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपसमोर राष्ट्रवादीचं आव्हान असणार आहे. “शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं पाप भाजपने केलं हे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी कधीच विसरणार नाही. आजपासून राष्ट्रवादी भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार”, असा इशारा राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आला आहे. मुंबईत आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महेश तपासेंकडून भूमिका जाहीर करण्यात आली.
आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट
राष्ट्रवादीच्या आमदारांनी जेव्हा शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी झालेल्या घडामोडी आणि येत्या काळात कशा पद्धतीने भाजपविरोधात लढा द्यायचा यावर सविस्तर चर्चा झाली. ‘विधानसभेत राष्ट्रवादी एक सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करेल’, अशी माहिती महेश तपासे यांनी दिली. आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शिलेदारांसह पुन्हा मैदानात उतरली असून येणाऱ्या निवडणुकीत भाजपविरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे, असंही तपासे म्हणाले आहेत.