ज्यांच्या मनधरणीसाठी जयंत पाटील कोल्हापुरात, ते सतेज पाटीलच जिल्ह्याबाहेर!

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील वाद सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून, ते काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महडिक यांच्यातील वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मात्र, जयंत पाटील ज्यांची मनधरणी करायला कोल्हापुरात येत आहेत, ते सतेज पाटीलच जिल्ह्यात नाहीत. सतेज पाटील आज […]

ज्यांच्या मनधरणीसाठी जयंत पाटील कोल्हापुरात, ते सतेज पाटीलच जिल्ह्याबाहेर!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील वाद सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून, ते काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महडिक यांच्यातील वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मात्र, जयंत पाटील ज्यांची मनधरणी करायला कोल्हापुरात येत आहेत, ते सतेज पाटीलच जिल्ह्यात नाहीत. सतेज पाटील आज सातारा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सतेज पाटलांच्या अनुपस्थितीत जयंत पाटील त्यांची कशी समजूत काढणार, हा प्रश्नच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, धनंजय महाडिक यांना कुठल्याही स्थितीत मदत करणार नाही, अशी भूमिका घेतलेले काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मुन्ना-बंटी यांचा वाद काय?

डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. हे दोघेही एकमेकांचे हाडवैरी आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतचं वैर विसरुन, त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली होती. इतकंच नाही तर मोदी लाटेत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार निवडूनही आले होते. सतेज पाटलांच्या पाठिंब्यामुळे धनंजय महाडिक निवडून आले.

मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून धनंजय महाडिकांचा चुलत भाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक उभे राहिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँटे की लढाई झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांना हरवण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रचंड जोर लावला. त्याचा परिणाम म्हणून तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू बनले. लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे.

VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील  

याशिवाय काँग्रेसचे विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार असलेले महादेवराव महाडिक यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता, निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करुन, सतेज पाटील यांचा पराभव केला.

या सर्वांचा वचपा सतेज पाटील यांनी 2015 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काढला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. तेव्हापासून महाडिक विरुद्ध बंटी असा सामना कोल्हापुरात सातत्याने रंगला आहे. मग ती जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो, गोकुळ दूधसंघ निवडणूक असो वा साखर कारखान्याची निवडणूक असो, सर्व ठिकाणी मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळतो.

दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकीचं मतदान येऊन ठेपलं असताना, बंटी-मुन्ना वाद सुटता सुटत नाही. त्यामुळे आघाडीत कोल्हापूरवरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

महाडिकांचं भाषण मुश्रीफांच्या कार्यर्त्यांनी रोखलं, हात धरुन ओढून पुन्हा भाषणासाठी आणलं   

शिवसेनेसाठी प्रयत्न करु, पण धनंजय महाडिकांवर आमचं प्रेम: चंद्रकांत पाटील 

राष्ट्रवादीला जिंकण्याची आशा असलेल्या 10 मतदारसंघात सद्यस्थिती काय आहे? 

मोर्चा एनडी पाटलांचा, एकत्र मुन्ना-बंटी, एण्ट्री नांगरे पाटलांची 

…तर सतेज पाटलांची भेट घेईन: मुन्ना महाडिक

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.