शरद पवारांच्या वाढदिवशी ठाकरे-गांधी यांचं शक्तिप्रदर्शन? जितेंद्र आव्हाड यांचं सूचक विधान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहे. सत्ताधारी पक्षांकडून राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघावर जिंकण्यसाठी रणनीती आखली जात आहे. तर विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षांच्या पराभवासाठी रणनीती आखली जात आहे. असं असताना आता विरोधी पक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत.

शरद पवारांच्या वाढदिवशी ठाकरे-गांधी यांचं शक्तिप्रदर्शन? जितेंद्र आव्हाड यांचं सूचक विधान
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 8:18 PM

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुढच्या महिन्यात 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून जाहीर सभेचं आयोजन केलं जात आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत एकत्रितपणे ही सभा घेण्याचा शरद पवार गटाचं नियोजन सुरु असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पण याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असं आव्हाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “12 तारखेला शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी प्रयत्न आहे की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित करून सभा घ्यायची. त्यात शरद पवार तर असतीलच. यावेळी सगळ्या पक्षांना एकत्र करून सभा घ्यायची, असा प्रयत्न आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता या प्रकरणावर नियमित सुनावणी पार पडत आहे. दरम्यान, काल झालेल्या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आपली साक्ष नोंदवताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. पण तो उल्लेख रेकॉर्डवर घेतला गेला नाही, असा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“सुनील प्रभू यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला, तो उल्लेख विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये घेतला नाही. त्यावर प्रभूंचे वकील कामत यांनी आक्षेप घेतला. अध्यक्षांशी वाद झाला. सुनील प्रभूंनी आपली जबानी देताना साक्ष देताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला. इंग्लिश ट्रान्सलेशन हेच जशाच्या तसं झालं पाहिजे आणि हे लक्षात घेता आलं पाहीजे की नार्वेकर हे आता स्पीकर नाहीत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“या प्रकरणात तेव्हा ते जज होते. हे वारंवार सुप्रीम कोर्टाने सांगण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राच्या प्रकरणात तुम्ही स्पीकर नाही तर यु आर द स्पिकिंग जज आहात. तरीही त्यांच्या हातून अशी चूक होणं हे अक्षम्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हे मराठीत येतं, मराठीतून घेतलं जातं, तर त्याची तिथं नोंद होते. ट्रान्सलेशन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बाजूला सारलं जातं, त्यांचं नाव घेतलं तिथून गायब केलं जातं. तसंही त्यांना संविधान बदलायचं असेल, त्यांनी आत्तापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव बाजूला करायला सुरुवात केली असेल”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.