माजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न, जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादीकडून 2004 मध्ये रमेश कदम चिपळूणचे आमदार झाले, मात्र भास्कर जाधवांसोबत मतभेदानंतर 2009 मध्ये त्यांनी शेकापच्या तिकिटावर सुनील तटकरेंविरोधात रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

माजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न, जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 4:37 PM

मुंबई : रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची पक्षात घरवापसी झाली. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर शेकाप-भाजप-काँग्रेस असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास अखेर वर्तुळाकृती होऊन राष्ट्रवादीतच पूर्ण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रमेश कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. (NCP’s former MLA Ramesh Kadam returns to party)

“राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला पाठबळ लाभले. काही कारणांमुळे मधल्या काळात ते वेगळे झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात आता पक्ष मजबुतीसाठी त्यांच्यासह पुन्हा जोमाने कामास सुरुवात करु” अशा भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या.

“अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण राजकारण हे बेरजेचे करायचे वजाबाकी, भागाकाराचे नाही. पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरु आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केली आहे. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत” असे संकेत यावेळी जयंत पाटील यांनी दिले.

रमेश कदम यांचा राजकीय प्रवास

रमेश कदम यांनी चिपळूणचे नगराध्यक्षपद भूषवले आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कदम यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून 2004 मध्ये ते चिपळूणचे आमदार झाले. मात्र भास्कर जाधव यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले होते.

रमेश कदमांनी 2009 मध्ये शेकापच्या तिकिटावर रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. कदम यांनी थेट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाच आव्हान दिले होते. काही काळातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र अवघ्या आठच महिन्यात त्यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला. मात्र जिल्हाध्यक्ष पदावरुन बाजूला केल्याने ते काहीसे नाराज होते.

दरम्यान, रमेश कदम यांच्यासह भाजपातून आलेले उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल आणि उषा चौधरी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. (NCP’s former MLA Ramesh Kadam returns to party)

परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. तर त्याआधी नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता.

संबंधित बातम्या :

अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार ‘व्हाया काँग्रेस’ राष्ट्रवादीत

आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

(NCP’s former MLA Ramesh Kadam returns to party)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.