न सिर झुकाते हैं, न उठाते हैं… हम नजर से नजर मिलाते हैं; मीनाक्षी लेखी यांचं प्रवासी गुजराती पर्वात सूचक विधान

देशाचं नेतृत्व मोदी यांच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही हे करू शकलो. मोदींच्या जागी दुसरा एखादा पंतप्रधान असता तर अशावेळी काय झालं असतं हे सांगता येत नाही, असंही त्या म्हणाल्या.

न सिर झुकाते हैं, न उठाते हैं… हम नजर से नजर मिलाते हैं; मीनाक्षी लेखी यांचं प्रवासी गुजराती पर्वात सूचक विधान
मीनाक्षी लेखी यांचं प्रवासी गुजराती पर्वात सूचक विधानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 4:17 PM

अहमदाबाद: गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबादमध्ये (Ahmedabad) तीन दिवसीय प्रवासी गुजराती पर्व 2022चा (Pravasi Gujarati Parv 2022) सोहळा सुरू आहे. भारतातील नंबर वन न्यूज नेटवर्क टीव्ही9 मराठीने हा सोहळा घडवून आणला आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील विविध क्षेत्रातील अडीच हजाराहून अधिक गुजराती सहभागी झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सकाळी या सोहळ्याला संबोधित केलं. त्यानंतर दुपारी परराष्ट्र राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनीही या सोहळ्याला संबोधित केलं. देशाची परराष्ट्र निती काय आहे यावर मी बोलणार नाही. मात्र, आमचं परराष्ट्र धोरण स्वच्छ आहे. ‘न हम नजर झुका कर करेंगे और न नजर उठा कर करते हैं. हम नजर मिलाकर काम करने में यकीन रखते हैं’, असं सूचक विधान मीनाक्षी लेखी यांनी यावेळी केलं.

रशिया आणइ युक्रेनच्या युद्धावरही मीनाक्षी लेखी यांनी भाष्य केलं. आम्ही स्वत:हून मध्यस्थी करू शकत नाही. ते त्या दोघांवर अवलंबून आहे. युक्रेनमध्ये भारताने मानवाधिकाराची मदत केली आहे. परंतु, आम्ही आपलंही लक्ष ठेवलं पाहिजे. आपण आखाती देशातून तेलाची खरेदी करतो. इराकवर बंदी असल्याने आपल्याला रशियाकडून तेल घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्याला कोणी झुकवू शकत नाही. आपण भारतीय वंशाच्या लोकांच्या वर्कफोर्सचा सन्मान करतो. त्यामुळेच आम्ही अनेक सरकारांशी मिळून प्रवासावर महत्त्वाचे निर्णय घेत आहोत. सर्वांनी भारताच्या दुतावासात नोंदणी करावी. म्हणजे आम्हाला मदत करता येईल, असं मीनाक्षी लेखी म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

एक घटना माझ्यासमोर आली होती. लोक कर्ज घेऊन परदेशात जातात आणि काही कारणांमुळे तिथे अडकून पडतात. आमच्या सरकारने त्यांचीही मदत केली आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारताने आपल्या एम्बेसी तयार ठेवल्या आहेत. समाजात प्रवाशांबाबत आसूया असते. भारतीय एक समजूतदार आणि मेहनती जमात आहे. त्यामुळे समाजात सुविधा मिळाल्यावर त्या तातडीने यशाचं सोपान चढतात, असंही त्यांनी सांगितलं.

ऑपरेशन वंदे भारतचीही त्यांनी माहिती दिली. या मिशन अंतर्गत तब्बल एक कोटी भारतीयांना भारतात आणलं गेलं. एक मेल आणि फोन कॉलच्या द्वारे लोकांना मदत करण्यात आली. भारतीय वंशाच्या विदेशी लोकांसाठी जे करणं शक्य होतं ते आम्ही केलं, असं त्यांनी सांगितलं.

देशाचं नेतृत्व मोदी यांच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही हे करू शकलो. मोदींच्या जागी दुसरा एखादा पंतप्रधान असता तर अशावेळी काय झालं असतं हे सांगता येत नाही, असंही त्या म्हणाल्या.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.