दिशा सालियन प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल, निलेश राणेंचा दावा

अभिनेत्री दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय हे सर्वांना माहीत आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल, असा गौप्यस्फोट भाजप नेते निलेश राणे यांनी केला.

दिशा सालियन प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल, निलेश राणेंचा दावा
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 12:39 PM

मुंबई: अभिनेत्री दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय हे सर्वांना माहीत आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल, असा दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. (nilesh rane slams cm uddhav thackeray over his statement)

‘टिव्ही9 मराठी’शी खास बातचीत करताना निलेश राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बलात्कार कुणी केला आणि हत्या कुणी केली हे सांगण्याची गरज नाही. हा तपास बाहेर आला तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. मात्र, सत्य बाहेर येऊ नये यासाठी पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, असं निलेश राणे म्हणाले.

सुशांतप्रकरणीही निलेश यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. सुशांतसिंह राजपूतची बॉडी एम्सकडे नव्हती. त्यामुळे एम्सलाही मर्यादा पडल्या. या प्रकरणात जे डमी पुरावे दिले गेले त्यानुसारच तपास झाला, असं सांगतानाच पोलीस दलातील काही अधिकारी दबावाखाली काम करत असतील. पुराव्याची अफरातफर करत असतील. म्हणूनच तपास चुकीचा झाला. त्यामुळे सीबीआयने खोलात जाऊन तपास करावा. पुरावे कुणी नष्ट केले, याचा अहवाल सीबीआयने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

… तुमचेही बाप काढू

मुख्यमंत्र्यांनी काल जी भाषा वापरली ती अत्यंत चुकीची आहे. एवढाच सामना करायचा असेल तर एकदा होऊन जाऊ द्या. वेळ आणि ठिकाण सांगा आम्ही येऊ. मग समजेल. कलानगरमध्ये काय चालतं ते सर्व बाहेर काढू, हे सर्व किस्से ऐकण्यासाठी महाराष्ट्र कान टवकारून बसला आहे, असं सांगतानाच आम्हाला अंगावर येण्याची गरज नाही. तसंही मी रोजच अंगावर जातो, असंही ते म्हणाले. एका केंद्रीय मंत्र्यांबद्दल खालच्या थराला जाऊन बोलणं योग्य नाही. हे मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. तुम्ही दुसऱ्यांचे बाप काढाल तर आम्हीही तुमचे बाप काढू. दुश्मन कितीही मोठा असला तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही. आता ज्या भाषेत बोलतील, त्याच भाषेत उत्तर देऊ, तुम्हाला ही धमकी वाटत असेल तर वाटू द्या. उद्धव ठाकरेंना एकेरी उल्लेख करण्याचं लायसन्स मिळलाले आहे काय?, असा सवालही त्यांनी केला.

सरकार पडणार हे पवारांनाही माहीत

उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे. तरीही त्यांना साधं दुकानही चालवता येत नाही. त्यांनी अंगावर… छाताडावर येण्याची वार्ता करू नये. जेवढे दिवस मुख्यमंत्री म्हणून मिळालेत, ते दिवस घालवावेत. हे सरकार स्वत:हून कोसळणार आहे. आम्हाला पाडण्याची गरज नाही. सरकार पडणार हे शरद पवारांनाही माहीत आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले हा मेळावा शिवाजी पार्कात झाला असता तर लाखोंचा समुदाय जमला असता. म्हणून ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम घेतला. तुमचे कार्यक्रम तुम्हाला सभागृहात चालतात. मग थिएटर का सुरू करत नाही?, असा सवालही त्यांनी केला. (nilesh rane slams cm uddhav thackeray over his statement)

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता; राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

‘यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?’ दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगना रनौतचा प्रत्युत्तर

काँग्रेस नेत्यांची सावरकरांबाबत अपमानकारक भाषा, तेव्हा शिवसेना गप्प का?

(nilesh rane slams cm uddhav thackeray over his statement)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.