निलेश राणे यांनी संजय राऊतांना पाडले उघडे, ट्विट करत केला गौप्यस्फोट

फोटोमध्ये संसदेत संजय राऊत यांच्याबरोबर नारायण राणेही दिसत आहे. निलेश राणेंनी शेलक्या शब्दात लिहून हा कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला.

निलेश राणे यांनी संजय राऊतांना पाडले उघडे, ट्विट करत केला गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 3:18 PM

मुंबई  : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वाद कमी होण्याची कोणतीही चिन्ह नाही. दोन्ही नेते रोज एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करताय. एकाने केलाला दावा दुसरा खोडून काढतोय. आता संजय राऊत यांनी आपण नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर कधीच भेटलो नाही, असा दावा शनिवारी केला होता. त्यावर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane)यांनी ट्विट करत गौप्यस्फोट केलाय.

हे सुद्धा वाचा

नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यांत सुरु असलेल्या वादानंतर राणे यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्याचे वक्तव्य केले. राणे म्हणाले होते की, “एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना चपलेने नाही मारलं तर बघा…”,

नारायण राणे यांच्या या आरोपांना नाशिकमधून संजय राऊत यांनी उत्तर दिले. यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, राणे यांनी आदित्य ठाकरेंवर किती घाणरडे आरोप केलेयं, काहीही पुरावे नसताना आदित्य ठाकरे यांना बदनाम केलंय. रश्मी ठाकरेंसंदर्भात ते कोणत्या भाषेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलले होते. राणे यांच्या वक्तव्यावर आताच माझे उद्धव ठाकरे यांच्यांशी बोलणे झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे हसत होते. खरंतर राणेंनी पक्ष सोडल्यानंतर मी कधी त्यांना भेटलो नाही. मी कधी बेमान, गद्दांना भेटत नाही. त्यांचं तोंडही पाहत नाही. परंतु राणे यांना आता उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा झाली असेल.

निलेश राणेंनी खोडला दावा निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा दावा खोडण्यासाठी संसदेतील फोटो ट्विट केला. त्या फोटोमध्ये संसदेत संजय राऊत यांच्याबरोबर नारायण राणेही दिसत आहे. निलेश राणेंनी शेलक्या शब्दात लिहून हा कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आता त्यावर संजय राऊत काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे. परंतु संजय राऊत आणि नारायण राणे यांचे राजकीय युद्ध सुरुच राहणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.