नितेश राणे प्रकृती बिघडली? रुग्णालयात ठेवलं जाण्याची शक्यता; तर प्रकृती अस्वास्थ्यावरुन वैभव नाईकांचा जोरदार टोला

नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टोला लगावलाय.

नितेश राणे प्रकृती बिघडली? रुग्णालयात ठेवलं जाण्याची शक्यता; तर प्रकृती अस्वास्थ्यावरुन वैभव नाईकांचा जोरदार टोला
वैभव नाईक, नितेश राणे
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 7:30 PM

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा अवधी संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा पोलिसांकडून 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. दरम्यान, नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सावंतवाडी कारागृह (Sawantwadi Jail) अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टोला लगावलाय.

नितेश राणेंचे वकील काय म्हणाले?

नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. तरीही कोर्टाच्या आदेशानुसार ते पोलीस कोठडीत गेले होते. पण आता जसं रेग्युलर चेकअप होईल, डॉक्टरांना जे काही आढळून येईल त्यानुसार पुढील कारवाई होईल, असं नितेश राणे यांचे वकील म्हणाले. त्यामुळे आता नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीदरम्यान रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आज कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांच्याकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी पार पडेल. त्यानंतर त्यांना जामीन मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वैभव नाईकांचा राणेंना टोला

शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले की, पोलिसांचा तपास पूर्ण झाला असेल म्हणून त्यांना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. नितेश राणे यांची तब्येत दरवेळी बिघडत असते. तब्येत बिघडणं हा राजकीय आजार आहे की खराखुरा आजार आहे हे डॉक्टर ठरवतील. त्यांची तब्येत बिघडू नये म्हणून शुभेच्छा, असा खोचक टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

नितेश राणेंना कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी 8 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला होता. नितेश राणे आणि राकेश परब यांच्यासाठी आम्ही युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीची त्यांची मागणी फेटाळली. नितेश राणेंना आता न्यायालयीन कोठडीत घेण्यात आलं आहे. आता पुढील कारवाई होईल. आता लगेच सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल केला जाईल. आज लगेच त्यावर सुनावणी होणार नाही. पण पुढील तारीख मिळेल त्यावेळी नितेश राणे यांना जामीन मिळेल, अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिलीय.

इतर बातम्या :

Nitesh Rane: नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना काहीसा दिलासा, 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.