कुडाळ: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्यावर भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी नाव न घेता अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली आहे. परवा चिपळूणचा डुक्कर कुडाळमध्ये आला. मी त्याला रान डुक्कर म्हणणार नाही. रान डुक्कर जंगलात असतो. तो चांगला असतो. हा चिखलातील डुक्कर आहे. याला एक दिवस चिखलातच लोळवणार नाही तर नावाचा राणे सांगणार नाही. काय लायकी आहे तुझी. तू राणे साहेबांबद्दल बोलणार?, असा संतप्त सवाल निलेश राणे यांनी केला.
निलेश राणे हे कुडाळ येथे एका सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांच्यावर घणाघाती टीका केली. हा स्वत:ला शेठ समजतो. मी भास्कर शेठ. अरे तुला बघून लोकं गेट बंद करतात. साल्या तू कसला शेठ?, असा हल्ला निलेश राणे यांनी चढवला.
एका कामत्याच्या कोरोना सेंटरमध्ये हे गेले होते. कोरोना पेशंट राहिले बाजूला, याचे आणि डॉक्टरांचेच बोलणे सुरू होते. साहेब ऑक्सिमीटरची गरज आहे. साहेब, रेमिडेसिव्हिरचं औषध आलं नाही… असं डॉक्टर सांगत होते. हे हम्मम.. हम्म करत होते. रेमडेसिव्हिरला तर राबडी म्हणाले. अरे राबडी देवी नाही रे, रेमिडेसिव्हीर आहे ते. तुम्हाला एवढं बोलता येत नाही? अन् तुम्ही राणे साहेबांवर टीका करणार? तुम्ही टीका करणार?त्यांनी रेमेडिसिव्हीर एका झटक्यात बोलून दाखवलं तर काहीही हरेल. हा साला चिपळूणचा वाळू चोर, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
तो असाच घाबरला पाहिजे. ही राणे सांहबेंची लोकं आहेत. कुणी जर तिथे काय फेकलं असेल ना ते चांगलंच केलं. कशाला सोडायचं यांना. तुम्हाला मनाला वाटेल तसं तुम्ही बोलत राहणार. हे कसं चालेल, असा सवाल करत निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याचं समर्थनच केलं.
म्हणे राणेंचा मुलगा एका पक्षात आणि राणे दुसऱ्या पक्षात होते. एकच उदाहरण सांगतो. यांचा मुलगा शेवटपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष होता राष्ट्रवादीचा. हे होते शिवसेनेत. मग तुझ्यात एवढा दम होता तर मुलाला राजीनामा का द्यायला सांगितला नाही? तुझा बाप तुला निवडून आणेन, राजीनामा दे असं का सांगितलं नाही? याचा मुलगा शेवटपर्यंत राष्ट्रवादीत होता. उद्धव ठाकरेंच्या पाया पडला आणि मुलासाठी अध्यक्षपद घेऊन आला. तेव्हा का नाही पोटनिवडणूक घेतली? असा सवाल त्यांनी केला.
आमच्या राणेंसाहेबांनी जे काही शिकवलं त्यातील एक महत्त्वाचं शिकवलं. ते म्हणजे जो काही हिसाबकिताब करायचा तो याच जन्मात करायचा. पुढच्या जन्मावर आपला विश्वास नाही, असं ते म्हणाले.
भास्करची इथे काही काढणार नाही. कारण इथे त्यांची पाच कार्यकर्तेही नाहीत. तो शिवसेनेच्या गर्दीत आला होता. त्याला एकटा यायला सांगा. वडापाववाला त्यांना उधारीही देणार नाही. हा स्वत:च्या गावात जातो. शिमग्याला पूजा लागते. तेव्हा गावात एक सण साजरा होत होता. हा गावात शिरला. मंदिरात शिव्या देत होता, अशी टीका त्यांनी केली.