Nitesh Rane Bail Application : नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पण अटक नाही! वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

पोलिसांची दादागिरी आहे आणि त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यावरुन हे स्पष्ट होतं की पोलिसांना नितेश राणे यांना कुठल्याही परिस्थितीत अटक करायची आहे. पण तसं होणार नाही, असा दावाही सतीश माने-शिंदे यांनी केला आहे.

Nitesh Rane Bail Application : नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पण अटक नाही! वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप
नितेश राणेंच्या जामीनावर उद्या सुनावणी
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 4:22 PM

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जातोय. असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार नितेश राणे यांना 10 दिवस अटक करता येणार नाही, असंही सत्र न्यायालयानं स्पष्ट केल्याचं नितेश राणे यांचे वकील सतीश माने-शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पोलिसांची दादागिरी आहे आणि त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यावरुन हे स्पष्ट होतं की पोलिसांना नितेश राणे यांना कुठल्याही परिस्थितीत अटक करायची आहे. पण तसं होणार नाही, असा दावाही सतीश माने-शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता नितेश राणे उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर उच्च न्यायालय नितेश राणे यांना जामीन देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा

दरम्यान, नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नितेश राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले. त्यामुळे वातावरण तापले. मला कायदा शिकवू नका, अशी आक्रमक प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली. शिवाय निलेश राणे आणि पोलिसामध्येही बाचाबाची झाली. पोलिसांनी गाडी थांबवली म्हणून निलेश राणे यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी यावरून सवाल उपस्थित केला. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश गाडीतून खाली उतरले आणि कोर्टात गेले. त्याआधी त्यांनी आपल्या वकिलांशीही चर्चा केली.

नितेश राणे प्रकरणात आतापर्यंत काय काय झालं?

संतोष परब हल्ला प्रकरणी प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तिथे त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली. तिथे त्यांना दुसरा मोठा दणका बसला. कारण हायकोर्टानेही नितेश यांना जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर राणेंनी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सुप्रीम कोर्टानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना दहा दिवस अटकेपासून संरक्षण देत पुन्हा सत्र न्यायालयाचा रस्ता दाखवला. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. मात्र, सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता नितेश राणे जामीनासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात.

इतर बातम्या :

नितेश राणेंना कोर्टाचा मोठा दणका, जामीन अर्ज फेटाळला, पुढे काय?

Video : सुप्रीम कोर्टानेही जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांनी केलेल्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, शेअर केला हा व्हिडिओ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.