Nitin Gadkari : पत्नीला न सांगता जेव्हा सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला! नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

नितीन गडकरी यांनी गुरुवारी राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाची पाहणी केलीय. हरियाणाच्या सोहनामध्ये एक कार्यक्रमही पार पडला. यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबाबाबतचा एक मोठा गौप्यस्फोट करत आपल्या कार्यशैलीचं दर्शन घडवलं आहे.

Nitin Gadkari : पत्नीला न सांगता जेव्हा सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला! नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 3:46 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्यव्यामुळे आणि कामाच्या धडाडीमुळे ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपमध्येच नाही तर सर्वच राजकीय पक्षात गडकरींना मानणारा मोठा वर्ग आहे. अशा नितीन गडकरी यांनी गुरुवारी राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाची पाहणी केलीय. हरियाणाच्या सोहनामध्ये एक कार्यक्रमही पार पडला. यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबाबाबतचा एक मोठा गौप्यस्फोट करत आपल्या कार्यशैलीचं दर्शन घडवलं आहे. (Nitin Gadkari demolished his father-in-law’s house for road works)

नितीन गडकरी म्हणाले की, तेव्हा माझं नवीनंच लग्न झालं होतं. माझ्या सासऱ्याचं घर रस्त्याच्या मधोमध येत होतं. रामटेकमध्ये ते घर होतं. तेव्हा मी पत्नीला कुठलिही कल्पना न देता सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला आणि त्या रस्त्याचं काम पूर्ण केलं. मात्र, त्यानंतर घरात काय झालं हे मी सांगणार नसल्याचं गडकरी म्हणाले.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचं काम कधी पूर्ण होणार?

नितीन गडकरी यांचा दिल्ली-मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांचा दौरा सुरु झाला आहे. नितीन गडकरी यांनी हरियाणा आणि राजस्थानमधील कामाची पाहणी केली. नितीन गडकरींनी सकाळी हरियाणामध्ये पाहणी केल्यानंतर राजस्थानमध्ये महामार्गाच्याकामाची हवाई पाहणी केली. या प्रकल्पामुळं दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून महामार्ग जाईल. दिल्ली- मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वे 1380 किलोमीटरचा आहे. असं गडकरी म्हणाले

2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी यांच्याकडून केली जातेय. हा महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च करुन पूर्ण केला जातोय. या महामार्गाचं काम 2023 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. या महामार्गाचं काम तीन राज्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात काही ठिकाणी काम थांबलं होत. मात्र, आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम महामार्गाचं करण्यात येत आहे.

देशातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे

दिल्ली ते मुंबई हा 1380 कि.मीचा एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे असेल. या महामार्गामुळं दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरनं कमी होईल. तर, नवी दिल्ली ते मुंबई यामार्गात येणाऱ्या शहरांना जोडलं जाईल. दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर शहरांना जोडलं जाईल.

इतर बातम्या :

ज्या तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती झालीय, तो नेमका काय आहे? सर्वात श्रीमंत ट्रस्टचा कारभार कसा चालतो?

भाजपवाले हिंदू, मग RSS विचारधारेने गांधींच्या छातीत 3 गोळ्या का घातल्या? : राहुल गांधी

Nitin Gadkari demolished his father-in-law’s house for road works

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....