विकासकामात अडथले आणू नका, नितीन गडकरींच्या पत्रानंतर हसन मुश्रीफांचं स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन

विकासाच्या कामात अडथळे आणू नका, असं आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वच पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना केलं आहे. गडकरी जर राज्यासाठी पैसा आणणार असतील तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आपल्या भागाचा विकास होत असेल तर कुणीही आडकाठी आणता कामा नये, असं मतही मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे. मुश्रीफ आज अहमदनगरमध्ये बोलत होते.

विकासकामात अडथले आणू नका, नितीन गडकरींच्या पत्रानंतर हसन मुश्रीफांचं स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन
हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 8:10 PM

अहमदनगर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या कामाबाबत शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी निर्माण करत असल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात वाशिमधील महामार्गाच्या कामातील अडथळ्यांचा उल्लेख गडकरी यांनी केलाय. त्याबाबत नितीन गडकरी यांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही. पण विकासाच्या कामात अडथळे आणू नका, असं आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वच पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना केलं आहे. गडकरी जर राज्यासाठी पैसा आणणार असतील तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आपल्या भागाचा विकास होत असेल तर कुणीही आडकाठी आणता कामा नये, असं मतही मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे. मुश्रीफ आज अहमदनगरमध्ये बोलत होते. (Hasan Mushrif appeals to local leaders of all political parties)

नार्वेकरांना मिळालेल्या धमकीवरुन भाजपवर टीका

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना आलेल्या धमकीबाबत मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली आहे. यापूर्वीही भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कुणाला धमकी देणार, कुणाची चौकशी करणार, मात्र जोपर्यंत सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या मनात आहे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार चालेल, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीवरूनही त्यांनी आमदार गोपीचंद पडलकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचं म्हटलंय.

स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा स्थगित

15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यांना ग्रामसभा घ्यायची असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घ्यावी असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. तर राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त भागासाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून कोल्हापूरला पंचनाम्यानुसार निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नाना पटोलेंचा गडकरींना टोला

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचं समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. पण 25 वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हतं का? आता कुणाच्या इशाऱ्याने गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे? असा सवाल नाना पटोले यांनी केलाय. त्याचबरोबर महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

अरविंद सावंत काय म्हणाले?

“माननीय नितीन गडकरी यांचा पूर्ण आदर आहे, पण त्यांनी शिवसेना शब्द वापरण्याऐवजी त्या एका विशिष्ट भागाचा उल्लेख केला असता, तर बरं झालं असतं. पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख केला. जणू काही शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे, असा सूर त्या पत्रातून व्यक्त होतोय, ते गैर आहे असं मला वाटते.” असं अरविंद सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या :

कामं थांबवा, नितीन गडकरींच्या स्फोटक पत्रानंतर आता शिवसैनिकाची कथित Audio क्लिप समोर

…तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामांचा विचार करावा लागेल, गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, वाचा जसंच्या तसं

Hasan Mushrif appeals to local leaders of all political parties

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.