उद्धव ठाकरेंची शिर्डीत नवं शहर वसवण्याची घोषणा, गडकरी म्हणतात, उत्तम निर्णय!

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयाचं स्वागत केलं आहे. शिर्डी विमानतळ परिसरात स्मार्ट सिटी विकसित करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्या निर्णयाचं स्वागत गडकरी यांनी केलंय.

उद्धव ठाकरेंची शिर्डीत नवं शहर वसवण्याची घोषणा, गडकरी म्हणतात, उत्तम निर्णय!
नितीन गडकरी, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 1:54 PM

अहमदनगर : केंद्रीय रस्त्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयाचं स्वागत केलं आहे. शिर्डी विमानतळ परिसरात स्मार्ट सिटी विकसित करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्या निर्णयाचं स्वागत गडकरी यांनी केलंय. (Nitin Gadkari welcomes CM Uddhav Thackeray’s decision)

‘मी काल परवा वर्तमानपत्रात वाचलं की माननीय उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील विमानतळाच्या परिसरात स्मार्ट सिटी वसवण्याचा निर्णय घेतला. फार चांगला निर्णय आहे. त्यामुळे आपल्याला आता रोड बनला, एअरपोर्ट बनला की मी दिल्लीत बघतो की पहिले पुढारी येतात आणि म्हणतात की अलाईन्मेंट दाखवा, कुठून रोड चाललाय. मी म्हणतो कशासाठी. म्हणतात जागा घेऊन ठेवतो आम्ही. त्यामुळे आता पुढाऱ्यांनी जागा घेण्याऐवजी सरकारनं जागा घेतली पाहिजे, असा माझा आग्रह आहे. त्या जागेवर तुम्ही डेव्हलपमेंट करा. स्मार्ट सिटी, लॉजिस्टिक पार्क डेव्हलप करा. यासाठी मी पूर्ण मदत करेल. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल’, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं कौतुक केलंय.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय काय?

विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही 76वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.

पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल,रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल.

गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला

नितीन गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरिच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल.

त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते, म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादानमुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

इतर बातम्या :

सोलापूर-नगर-नाशिक-सुरत ग्रीनफिल्ड हायवे होणार, 50 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याची गडकरींची घोषणा

प्रत्येक भाषणात नितीन गडकरी म्हणतात ऊसापासून इथेनॉल निर्मिती करा, आज पवारांनी त्याच्या पुढचा पर्याय गडकरींना सांगितला!

Nitin Gadkari welcomes CM Uddhav Thackeray’s decision

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.