AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : गरज संपल्यानंतर कोणालाही फेकून देऊ नका; गडकरी यांचा कंपन्यांना सल्ला

Nitin Gadkari केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कर्मचारी आणि उद्योजक यांच्यातील संबंध कसे असावेत? याबाबत गडकरी यांनी उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Nitin Gadkari : गरज संपल्यानंतर कोणालाही फेकून देऊ नका; गडकरी यांचा कंपन्यांना सल्ला
काय म्हणाले नितीन गडकरीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 2:12 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरमध्ये  (Nagpur) आयोजित एका कार्यक्रमात उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कर्मचारी आणि उद्योजक यांच्यातील संबंध कसे असावेत? याबाबत गडकरी यांनी उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला आहे. कोणाचा वापर करून त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोणाचा वापर करून त्याला गरज संपल्यानंतर फेकून देणे चूक आहे. चागंले दिवस असो अथवा वाईट दिवस तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा हाथ पकडला तर तो कधीच सोडू नका. फक्त उगवत्या सुर्याचीच नाही तर जो सूर्य मावळतो आहे त्याची देखील पूजा करणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांचं कंपनीच्या कामात मोलाचं योगदान असतं असं गडकरी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटलं आहे की, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र (social sector) असो अथवा उद्योग क्षेत्र असो माणसं जोडणं महत्त्वाचं आहे. जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची खरी ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क वाढता कसा राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे.

प्रयत्न करणे सोडून नका

यावेळी उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण देत म्हटले की, एखादी व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो.

म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रात जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची खरी ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क वाढता कसा राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

विहिरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी आपला जुना एक किस्सा देखील सांगितला. गडकरी म्हणाले जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता.

तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही.

..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.