बीड : लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं.
या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यावेली बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
कोरोना होता म्हणून यात्रा थांबविली होती. आता कोरोना थोडाफार संपुष्टात आल्यावर यात्रा सुरू झाल्या. परळीत आल्यावर कोरोना संपुष्टात आल्याचे वाटले. माझ्या लग्नाची वरात निघाली नाही, मात्र परळीत वरात पाहिली. असंख्य तरुण धनंजय मुंडेवर प्रेम करतात हे मी आज परळीत पाहिले. हार घालण्याची पद्धत वेगळी होती, बघेल तिथं क्रेनने हार घातले. लोकांचे प्रेम पाहून दहा निवडणुकादेखील मुंडे यांची कोणी थांबवू शकत नाही. परळी फार पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण जोर इथल्या नेत्यात आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रतल्या कुठल्याही नेत्याने घोटाळा केला की त्याचा पर्दाफाश धनंजय मुंडेंनी विरोधी पक्ष नेता असताना केला. बारामती पवारांच्या मागे उभी राहिली म्हणूनच विकास झाला. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम मुंडे भविष्यकाळात करतील. एक विधानसभेची निवडणूक झाली म्हणजे काही नाही, जवळचे लोक दूर गेले की सर्व संपते, धनंजय मुंडेंवर नवी जबाबदारी मिळाली, मला अध्यक्षपदाची धुरा दिली त्यावेळी अनेकांनी पक्ष बदलला होता, मात्र दोन वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती बदलली आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
शरद पवारांनी ईडीचा सामना केला. आज त्याला दोन वर्षे झाली. भाजपचं काम ईडी करत आहे. भाजपमधून नामदेव आघाव आणि नेते आले तसे असंख्य राष्ट्रवादीतून गेलेले परत येत आहेत. बीडमध्ये पाऊस जास्त पडला, पुढच्या आठवड्यापर्यंत मदत मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सोयाबीनचा दर 11 हजार होता मात्र मोदी साहेबांमुळे चार हजारावर आले. श्रीमंत माणसाचे चोचले पुरवितात गरिबांची किंमत नाही. दोन विमान खरेदी करणार आहे. मोदींची इच्छा आहे म्हणून घर नवीन बांधत आहेत. जे भक्कम आहे.
राज्याच्या मदतीला केंद्र आले पाहिजे, ते त्यांना सुचत नाही. केंद्र सरकारने मदतीचा वाटा उचलला नाही. महाराष्ट्राकडे दुजाभावाने केंद्र पाहते आहे, जनतेने आता याची खूणगाठ बांधली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स मागे लावत आहेत, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी भाजपवर केला. सगळ्या केंद्रीय एजन्सी सरकार पाडण्यासाठी वापरत असाल तर इंदिरा गांधी होईल, असंही जयंत पाटील म्हणाले.
माझ्या आढाव्यात धनंजय मुंडे पास झाले आहेत, परत मी आढावा घेण्यासाठी येणार नाही, असं जयंत पाटील हसत हसत म्हणाले. धनंजय मुंडे माझ्या भावासारखे आहेत, राजकीय सामंजस्यपणा धनंजय मुंडेंमध्ये आहे, असं सर्टिफिकेट जयंत पाटील यांनी दिलं.
कार्यक्रम करण्याची पद्ध प्रचंड मोठी आहे. कोरोनाचे नियम पाळून आम्ही बैठक लावली होती. पोलिसांचा गैरसमज होईल, बैठकीला प्रचंड गर्दी झाली जे अपेक्षित नव्हते, आम्ही कोणालाही बोलावलं नाही. कार्यकर्ते स्वतः हून आले आहेत. नियम मोडावेत हे मला अभिप्रेत नव्हते. पोलिसांनादेखील त्रास झाला. माणसांचा आवेश आणि उत्साह यामुळे ही गर्दी झाली, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.
हा पक्ष कार्यकर्त्यांची बुज राखणारा आहे, तुम्ही बोलविल्यास पवारसाहेब चहा पिण्यासाठी घरी येतील. गोपीनाथ मुंडेंना साथ देणारी माणसे आज धनंजय मुंडेंच्या मागे आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
संबंधित बातम्या
VIDEO | माझ्या घरातल्यांना माझे गुण कळले नाहीत, परळीतून धनंजय मुंडेंची तुफान फटकेबाजी