Solapur : शिवसेनेतच नाहीतर राष्ट्रवादीमध्येही बंडखोरी, तानाजी सावंत यांची सोलापुरातही खेळी..!

राष्ट्रवादीच्या 30 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा थेट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोड चिठ्ठी देत आता हे पदाधिकारी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता इतर पक्षातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

Solapur : शिवसेनेतच नाहीतर राष्ट्रवादीमध्येही बंडखोरी, तानाजी सावंत यांची सोलापुरातही खेळी..!
सोलापुरात राष्ट्रवादीच्या 100 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 4:47 PM

सोलापूर : आतापर्यंत (Shivsena Party) शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसागणीस वाढत असल्याचे चित्र उभा महाराष्ट्र पाहत आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीतून माजी आमदार राजन पाटील आणि आ. बबनदादा शिंदे हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्या आगोदर सोलापूरातील (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 30 पदाधिकाऱ्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या बंडखोरीला (Dattatray Bharne) माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना त्यांनी टार्गेट केले असून त्यांच्या काळात पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाला नाही. शिवाय बाहेरच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यामुळे सोलापुरातील पक्षसंघटनेत हवा तो बदल झाला नाही. त्यामुळेच आता हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 30 पदाधिकाऱ्यांनी थेट व्हाट्सअॅप वरच राजीनामा वरिष्ठांकडे सपूर्द केला आहे. आता हे पदाधिकारी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वामध्ये आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

नेमके कारण काय?

राष्ट्रवादीतून शिंदे गटात प्रवेश असे पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यामध्ये घडत आहे. शिवाय सोलापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता, मात्र गतवेळच्या महापालिका निवडणुकांपासून या जिल्ह्यात भाजपाने शिरकाव केला आहे, तर आता शिंदे गटालाही समर्थन मिळत आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील पालकमंत्री भरणे मामा यांनी कार्यकर्त्यांना नव्हे तर आपल्याच भाच्यांना संधी दिल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे पक्ष संघटन करणारे राहिले बाजूला आणि उपभोग घेणारे हे दुसरेच असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

थेट व्हॉट्सॲपवर राजीनामा

राष्ट्रवादीच्या 30 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा थेट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोड चिठ्ठी देत आता हे पदाधिकारी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता इतर पक्षातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. गेल्या 10 ते 12 वर्षापासून पक्षात कार्यरत असलेले पदाधिकारी आता शिंदे गटात सहभागी होत आहेत.

हे सुद्धा वाचा

जिल्हाध्यक्षांनी दिली होती पूर्व कल्पना

राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद हे त्याच स्टेजलाच मिटवले जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र, सोलापूरात पक्षातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. शिवाय जिल्हाध्यक्षांकडूनच नाराजांना इतर पक्षाचा पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर बळीराम साठे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही नाराज असल्याचे चित्र आहेत. त्यामुळे पक्ष संघटन आणि नाराजी रोखण्याचे आव्हान केवळ शिवसेनेलाच आहे असे नाहीतर इतर पक्षांमध्येही तशीच अवस्था आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.