Jayant Patil : शिंदे गटातच नाहीतर भाजपामध्येही अस्वस्थता, जयंत पाटलांच्या दाव्याने खळबळ..! काय आहेत नाराजीची कारणे?

बंडखोर आमदरांनी कायद्याचे पालन केलेले नाही. त्यांच्या अपात्रतेबद्दल कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. सध्याचे सरकार हे बेभरवश्याचे असून सरकारमधील आमदार हे केव्हाही अपात्र होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात साशंका आहे. सध्या तरी सर्वकाही अलबेल असल्याचे दाखवले जात आहे पण अंतर्गत नाराजी ही वाढत आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर हे सरकार जास्त काळ सत्तेमध्ये राहणार नाही.

Jayant Patil : शिंदे गटातच नाहीतर भाजपामध्येही अस्वस्थता, जयंत पाटलांच्या दाव्याने खळबळ..! काय आहेत नाराजीची कारणे?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 9:54 PM

मुंबई :  (Eknath Shinde) शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यापासून या गटातील आमदार हे नाराज असल्याचा सूर उमटत आहेत. शिवाय त्यानुसार काही आमदारांनी आपली नाराजी व्यक्तही केलीय. इथपर्यंत ठिक होते पण (Jayant Patil) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र, केवळ शिंदे गटातच (Tone of displeasure) नाराजीचा सूर असे नाहीतर भाजपामध्येही नाराजी असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाहीतर यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील कोणीही नाराज नाही. सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केल्याचे शिंदे गटातून सांगितले आहे. मात्र, पडद्यामागे नेमकी कोणती राजकीय खलबते सुरु असतील हे मध्यंतरीच्या राजकीय नाट्यानंतर सांगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या दाव्यामध्ये नेमके तथ्य आहे का हे तर येणारा काळच सांगेल.

काय आहेत नाराजीची कारणे?

मंत्रीमंडळ विस्तार होण्यापूर्वी शिंदे गटातील अनेक आमदार हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. पण विस्तारानंतर अनेकांचा भ्रमनिराश झाला आहे. तर काही आमदारांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याची खंत शिंदे गटातील आमदारांमध्ये आहे तर भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतानाही त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागल्याची खदखद अनेकांच्या मनात असल्याचेही जयंत पाटलांनी सांगितले आहे. नाराज आमदारांना पुढील टप्प्याचे आमिष दाखवण्यात आले असले तरी याबाबत संभ्रमता असल्याचे पाटलांनी सांगितले आहे.

आमदारांवर कारवाईची टांगती तलवार

बंडखोर आमदरांनी कायद्याचे पालन केलेले नाही. त्यांच्या अपात्रतेबद्दल कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. सध्याचे सरकार हे बेभरवश्याचे असून सरकारमधील आमदार हे केव्हाही अपात्र होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात साशंका आहे. सध्या तरी सर्वकाही अलबेल असल्याचे दाखवले जात आहे पण अंतर्गत नाराजी ही वाढत आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर हे सरकार जास्त काळ सत्तेमध्ये राहणार नाही. जयंत पाटलांनी शिंदे सरकारबद्दल एक ना अनेक शक्यता वर्तवल्या असल्या तरी यामध्ये तथ्य किती हे देखील पहावे लागणार आहे.

बंडखोरांवर मतदार नाराज

पैठण मतदार संघाचे आमदार संदिपान घुमरे यांना शिंदे सरकारच्या काळात मंत्रीपद देण्यात आले आहे. मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर घुमरे हे प्रथमच आपल्या मतदार संघात दाखल झाले होते. पण त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला काही मोजक्याच कार्यकर्त्यांची गर्दी होती. तर कार्यक्रम ठिकाणच्या खर्च्या ह्या रिकाम्याच होत्या. त्यामुळे पैठण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे असे, घुमरेंनी केलेली बंडखोरी येथील मतदारांनाही पटलेली नाही असा आरोप शिवसेनेचे आंबादास दानवे यांनी केला आहे. बंडखोर आमदारांवर मतदार हे खरोखरच नाराज का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.