आता मशाल चिन्हासाठी हा पक्ष आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह यावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. मात्र समता पक्षाचा मशाल हे चिन्ह का अडवून ठेवले आहे, असा प्रश्न उपस्थित करत याबाबत लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.

आता मशाल चिन्हासाठी हा पक्ष आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय
Image Credit source: supreme_court
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 2:02 PM

ठाणे : संजय राऊत यांच्याकडे खोकेही उरले नाहीत. खोक्यांचा पक्ष म्हणून हिणवण्यापेक्षा स्वतःच्या हातून काय सुटले आहे याचा विचार करा. आमचे मशाल चिन्ह आम्हाला परत हवे आहे. ते दिले नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाणार असल्याचं समता पक्षानं (Samata party) म्हंटलंय. शिवसेनेचे चिन्ह व नाव निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले. त्यानंतर आता मशाल चिन्हावरही समता पक्षाने दावा केला आहे. काल निवडणूक आयोगाला समता पक्षाकडून मशाल चिन्हाबाबत निवेदन दिले. त्यानंतर आज समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

मशाल चिन्ह अडकवून का ठेवता?

यापुढे आपला चिन्ह मशालसाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा दावा केला आहे. या वेळी समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन केले. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह यावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. मात्र समता पक्षाचा मशाल हे चिन्ह का अडवून ठेवले आहे, असा प्रश्न उपस्थित करत याबाबत लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.

राऊत यांनी याचा विचार करावा

संजय राऊत यांनी खोके घेऊन बनलेला पक्ष असे उद्गार काढले खरे. मात्र त्यांच्याकडे तर खोके पण उरले नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले तरीही त्यांना समजले नाही. इतकेच नव्हे तर पक्षाचे नाव, चिन्ह सर्वच गोष्टी एकनाथ शिंदे यांनी सहज मिळवल्या. त्यामुळे यांच्याकडे काहीच राहिले नाहीत. खोक्यांचा पक्ष म्हणून हिणवण्यापेक्षा स्वतःच्या हातून काय सुटले आहे याचा विचार करावा. असा सल्ला समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी दिला.

मशाल चिन्हावर आक्षेप

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर पोटनिवडणूक लढवली. समता पक्षाच्या म्हणण्यानुसार, मशाल हा त्यांच्या पक्षाचा चिन्ह आहे. त्यामुळे यापुढं ठाकरे यांना मशाल चिन्ह देण्यात येऊ नये. आधीच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष हे दोन्ही शिंदे गटाकडे देण्यात आलीत. आता मशाल चिन्हावरही आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे ठाकरे गट आणखी संकटात सापडला आहे. त्यांना दुसरा चिन्ह शोधावा लागणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.