NCP Meeting | शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार
शरद पवार यांच्या पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादीची आता दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मंगळवारी (7 डिसेंबर) ही बैठक होणार असून यामध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. बैठकीचे अध्यश खुद्द शरद पवार असून यामध्ये कार्यकारिणीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : राज्य तसेच देशपातळीवर मोठ्या घडामोडी आहेत. केंद्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय उभा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माहिमेचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादीची आता दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मंगळवारी (7 डिसेंबर) ही बैठक होणार असून यामध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. बैठकीचे अध्यश खुद्द शरद पवार असून यामध्ये कार्यकारिणीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होणार आहे. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलीय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीत पक्षातंर्गत होणारा निवडणूक कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
यूपीए किंवा ममता बॅनर्जी चर्चेचा मुद्दा नसणार
राष्ट्रवादीची बैठक थेट दिल्लीला होणार असल्यामुळे या बैठकीत नेमके कोणते विषय असणार आहेत. काय चर्चा करण्यात येणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाईल. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत यूपीए तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर चर्चा केली जाईल का ? असे विचारले जात आहे. त्यावर या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विशेष निमंत्रित आणि जे मंत्री आहेत त्यांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीत यूपीए किंवा ममता बॅनर्जी हा मुद्दा नसून फक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
इतर बातम्या :
Obc : ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचं षडयंत्र, फडणवीसांचे लोक कोर्टात का जातात? भुजबळांचा सवाल
Jacqueline Fernandes : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनला पुन्हा समन्स, 8 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश