‘ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

सत्तेत आल्यानंतर ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा, आम्ही प्रश्न सोडवू. त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही. जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय.

'ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही', जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 2:16 PM

नांदेड : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलं. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांच्या नेतृत्वात हजारो भाजप कार्यकर्ते विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. महाविकास आघाडी सरकारला आव्हान देताना फडणवीस यांनी आम्हाला सत्ता द्या, 4 महिन्यात ओबीसींची राजकीय आरक्षण परत मिळवून दाखवतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल, अशी गर्जना केली. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (Jayant Patil criticizes Devendra Fadnavis on OBC reservation issue)

सत्तेत आल्यानंतर ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा, आम्ही प्रश्न सोडवू. त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही. जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय. त्याचबरोबर सत्तेत आल्याशिवाय काहीच करायचं नाही का? असा सवालही जयंत पाटील यांनी फडणवीसांना विचारला आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना श्रेय देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.

संजय राऊतांचाही फडणवीसांना टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. ते मला चांगलं आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावलाय.

देवेंद्र फडणवीसांची गर्जना काय?

पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

माझ्या हातात सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : फडणवीस

बिंदू चौकात या, समोरासमोर चर्चा करु, चंद्रकांत पाटील यांचं चॅलेंज हसन मुश्रीफांनी स्वीकारलं!

Jayant Patil criticizes Devendra Fadnavis on OBC reservation issue

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.