‘विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले’, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केलीय.
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावरुन आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केलीय. (Keshav Upadhyay Criticize Thackeray Government over By-elections of ZP, Panchayat Samiti)
“राज्यातील आघाडीसरकार अपयशामुळे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले. ज्या जिल्हा परिषदांची केस होती तेथे आता पोटनिवडणूका लागल्या. मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले. प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले’, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर उपाध्ये यांनी वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्यावर टीका केलीय.
राज्यातील #आघाडीसरकार अपयशामुळे #ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले. ज्या जिल्हा परिषदांची केस होती तेथे आता पोटनिवडणूका लागल्या. @VijayWadettiwar @ChhaganCBhujbal नुसतेच घोषणा करत राहिले. प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले https://t.co/HvXc9tdYCI
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 22, 2021
निवडणूका कधी?
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका तेथील कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
किती जागांवर मतदान
धुळ्यात 15, नंदूरबारमध्ये 11,अकोल्यात 14, वाशिममध्ये 14 आणि नागपूरमध्ये 16 जिल्हापरिषद विभागात निवडणुका होणार आहेत. तर, धुळ्यात 30, नंदूरबारमध्ये 14, अकोल्यात 28, वाशिममध्ये 27 आणि नागपूरमध्ये 31 पंचायत समिती निर्वाचक गणामध्ये निवडणुका होणार आहेत.
सुप्रीम कोर्टानं OBC आरक्षण रद्द केलेल्या 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, संपूर्ण निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवर https://t.co/jEW4pulXm2 @OfficeofUT @Pankajamunde @VijayWadettiwar @BJP4Maharashtra #obcreservation #ZPByElection #Dhule #Akola
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
संबंधित बातम्या :
तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे नेऊ: अजित पवार
Keshav Upadhyay Criticize Thackeray Government over By-elections of ZP, Panchayat Samiti