‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभेला संधी मिळाली नसती’ रोहिणी खडसेंच्या टीकेला रक्षा खडसेंचं उत्तर

ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल रोहिणी खडसे यांनी विचारला आहे. त्याला आता एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलंय.

'भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभेला संधी मिळाली नसती' रोहिणी खडसेंच्या टीकेला रक्षा खडसेंचं उत्तर
रोहिणी खडसे, रक्षा खडसे
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 8:49 PM

जळगाव : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पुर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल रोहिणी खडसे यांनी विचारला आहे. त्याला आता एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलंय. ओबीसी समाजाने विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना संधी मिळाली नसती, असा टोला रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसेंना लगावलाय. (MP Raksha Khadse’s reply to Rohini Khadse’s criticism on Devendra Fadnavis)

एकीकडे ओबीसी आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटिप्पणी सुरु असताना दुसरीकडे आता याच मुद्द्यावरुन नणंद-भावजय आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. खडसे यांच्या कन्या आणि खडसे यांच्या सुनबाई यांच्यातच आरोप-प्रत्यारोप सुरु झालाय. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. तर रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणावरुन नणंद-भावजय एकमेकांसमोर आल्या आहेत. रोहिणी खडसे यांनी ओबीसी नेतृत्व संपवणाऱ्या भाजपला आताच ओबीसींची कळवळा कसा आला? असा सवाल केलाय. त्यावर भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर आमच्यासारख्या ओबीसींना संधी मिळाली नसती. रक्षा खडसे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नसतं, असं उत्तर रक्षा खडसे यांनी दिलंय.

रोहिणी खडसे यांचा फडणवीसांवर हल्ला

रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केलाय. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना रोकडा सवाल केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलंय.

रोहिणी खडसेंनी असं ट्विट करण्यामागचं कारण काय?

एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पावलोपावली त्रास दिला, क्षणाक्षणाला छळलं, प्रसंगी पक्षातून बाहेर जाण्यासंबंधीचं पाऊल उचलावं लागलं, अशी थेट टीका स्वत: एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना केली होती. ओबीसी नेतृत्व डळमळीत करण्याचं कामही फडणवीसांनी अनेकदा केल्याचं खडसेंनी म्हटलं. याचाच संदर्भ रोहिणी खडसे यांच्या या ट्विटला आहे.

संबंधित बातम्या :

‘आम्हाला सांगा, 4 महिन्यात इम्पिरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत करु, नाही तर पदावर राहणार नाही’, फडणवीसांचं जाहीर चॅलेंज

ओबीसी राजकारणावर भाजपकडून सत्ताधारी चेकमेट, ‘त्या’ जागांवर फक्त ओबीसी उमेदवार देण्याचीच फडणवीसांची घोषणा 

Raksha Khadse’s reply to Rohini Khadse’s criticism on Devendra Fadnavis

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.