Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री सुनील केदार यांचा सरकारला घरचा आहेर, दिला महत्वाचा सल्ला

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावं. कोरोनाच्या काळात या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं गेलं नाही, असा घरचा आहेर मंत्री सुनील केदार यांनी महाविकास आहाडी सरकारला दिला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री सुनील केदार यांचा सरकारला घरचा आहेर, दिला महत्वाचा सल्ला
सुनिल केदार, क्रीडा मंत्री
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 3:34 PM

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दा अद्याप सुटलेला नाही. अशावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, तर एका जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आज राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. तसंच भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. अशावेळी सरकारमधील एका मंत्र्यानेच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जावं असा सल्ला दिलाय. (Sunil Kedar Advice to Mahavikas Aghadi government should go to the Supreme Court again)

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावं. कोरोनाच्या काळात या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं गेलं नाही, असा घरचा आहेर मंत्री सुनील केदार यांनी महाविकास आहाडी सरकारला दिला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द ठरवल्यानंतर सदस्यत्व रद्द झालेल्या सर्व जागांवर महाविकास आघाडी सरकार ओबीसी उमेदवार देणार असल्याचंही सुनील केदार यांनी स्पष्ट केलंय. तसंच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संपूर्ण देशासाठी लागू व्हावा. फक्त 5 जिल्हा परिषदांसाठी हा निर्णय लागू होणं दुर्भाग्यपूर्ण असल्याचंही केदार म्हणाले. तर राजीनामा देण्याची घोषणा करणाऱ्या डॉ. बबनराव तायवाडे यांची भेट घेणार असल्याचंही केदार यावेळी म्हणाले.

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांचा राजीनामा

पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला न्याय आरक्षण मिळवून देता येत नसेल तर पदारवर राहण्यात उपयोग काय? असा उद्विग्न सवाल करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्या संध्याकाळपर्यंत राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार असल्याचं तायवाडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही घोषणा केली. या पदावर राहून माझ्या समाजाला न्याय मिळत नसेल तर मी या पदावर राहण्यास योग्य नाही. म्हणून मी येत्या 1 ते 2 दिवसात या पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आलो आहे. तत्वांशी तडजोड करू शकत नाही. त्यामुळे उद्या संध्याकाळीच मी राज्यपालांना राजीनामा पाठवणार आहे, असं तायवाडे यांनी सांगितलं.

कोण आहेत बबनराव तायवडे?

>> ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष >> त्यांनी धनवटे नेशनल कॉलेज मध्ये प्राचार्य म्हणून काम बघितलं >> काँग्रेस च्या तिकिटावर 2013 मध्ये त्यांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवली >> तायवाडे कॉलेज नावाने त्यांचं कॉलेज आहे >> काँग्रेस नेते , आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे >> नागपूर विद्यापीठ सिनेट मेम्बर म्हणून काम पाहिलं

आयोगातील सदस्यांची नावे

प्राचार्य बबनराव तायवडे अॅड. चंद्रलाल मेश्राम (माजी न्यायमूर्ती) अॅड. बालाची किल्लारीकर प्रा. संजीव सोनावणे डॉ. गजानन खराटे डॉ. निलीमा सराप (लखाडे) प्रा. डॉ. गोविंद काळे प्रा. लक्ष्मण हाके ज्योतीराम माना चव्हाण

इतर बातम्या :

पालघर झेडपी आणि पंचायत समिती पोटनिवडणूक; उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, कशी आहे राजकीय स्थिती?

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित, खटला चालवला जाणार

Sunil Kedar Advice to Mahavikas Aghadi government should go to the Supreme Court again

मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.