काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात?
नांदेड : 2014 ला मोदी लाटेतही निवडून आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये त्यांच्या उमेदवारीवर दोन अपक्ष उमेदवारांनी आक्षेप नोंदवलाय. अशोक चव्हाण यांच्याकडे गॅस एजन्सी आहे. ही एजन्सी म्हणजे सरकारी लाभाचे पद आहे असा आक्षेप एका अपक्ष उमेदवाराने घेतलाय. तर दुसऱ्या अपक्ष उमेदवाराने अशोक चव्हाण […]
नांदेड : 2014 ला मोदी लाटेतही निवडून आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये त्यांच्या उमेदवारीवर दोन अपक्ष उमेदवारांनी आक्षेप नोंदवलाय. अशोक चव्हाण यांच्याकडे गॅस एजन्सी आहे. ही एजन्सी म्हणजे सरकारी लाभाचे पद आहे असा आक्षेप एका अपक्ष उमेदवाराने घेतलाय. तर दुसऱ्या अपक्ष उमेदवाराने अशोक चव्हाण यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात मुलींच्या व्यवहाराच्या माहिती दिली नाही, असा आक्षेप नोंदवलाय.
नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तब्बल दोन तास सुनावणी घेतली. तूर्त जिल्हाधिकारी यांनी यावरचा निर्णय राखून ठेवलाय. याबाबत रात्री उशीरा निर्णय येणार आहे. अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवरील या आक्षेपामुळे काँग्रेसमध्ये सध्या धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे आपली उमेदवारी रद्द व्हावी आणि पत्नी अमिता चव्हाण निवडणुकीत उभ्या रहाव्यात यासाठी ही अशोक चव्हाण यांचीच खेळी असावी अशीही चर्चा होत आहे.
यावेळी निवडणूक लढण्यास अशोक चव्हाण अगोदरपासूनच उत्सुक नसल्याचं बोललं जात होतं. कारण, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता त्यांनी राज्याच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पण पक्षाच्या आदेशानंतर अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. पण आता अपक्ष उमेदवारांच्या आक्षेपामुळे उमेदवारीवर टांगती तलवार आहे.
व्हिडीओ :