पंजाब सरकारवर भाजपच्या नेत्यांची टीकेची झोड उठवली आहे. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांवर देशभरातील भाजप नेत्यांनी निशाणा साधत मोदींसोबत पंजाबमध्ये जे झालं, त्याला कारणीभूत ठरवलंय. अशातच आता ओदिशाच्या मुख्मयंत्र्यांनीही पंजाब सरकारला खेडेबोल सुनावले आहे.
ओदिशाचे मुख्यमंत्री असलेल्या नवीन पटनायक यांन पंजाब सरकारवर अप्रत्यक्षपणे टोला हाणलाय. पंतप्रधान या पदाबाबत भाष्य करताना त्यांनी म्हटलंय की,…
देशाचे पंतप्रधान ही एक संस्था आहे. तिचं रक्षण करणं आणि तिला सुरक्षा देणं हे प्रत्येक सरकारं कर्तव्य आहे. या संस्थेला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची काळजी प्रत्येक सरकारनं घ्यायला हवी. पण या संस्थेविरोधात किंवा या संस्थेला हानी पोहोचेल असं जर कोणतं सरकार काम करत असेल, ते लोकशाहीमध्ये कधीच स्वीकारलं जाऊ शकत नाही!
पंजाबमध्ये बुधवारी मोदींचा ताफा काही काळ अडकून पडला होती. 15 ते 20 मिनिटं हा ताफा एका उड्डाणपुलावर अडकला होता. सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीमुळे असं झाल्यांचं प्रथमदर्शनी सांगितलं जातं होतं. दरम्यान, यामुळे मोदींनी पंजाबच्या फिरोजपुरात आयोजित केलेल्या सभेला जाता आलं नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. बुधवारी मोदींची फिरोजपूरमध्ये सभा होणार होता. त्यासाठी पंजाबमध्ये दाखल झाले होते. हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकापासून अवघ्या तीस किलोमीटरच्या अंतरावर मोदींचा ताफा एका उड्डाण पुलावर पोहोचला आणि तिथेच अडकला.
काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचं लक्षात आल्याकारणामुळे मोदींचा ताफा अडकल्याची माहिती समोर आली. मोदींच्या सुरक्षेतली ही मोठी चूक मानली जाते आहे. पोलीस आणि इतर वाहतूक यंत्रणांच्या उपस्थितीत असं नेमकं घडलंच तरी कसं, असाही प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. दरम्यान, हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंतही पोहोचलंय. केंद्रीय गृहमंत्रालयानंही या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पंजाबमधील आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण चांगलंच गाजण्याचीही चिन्ह आहेत.
The Prime Minister of India is an institution. It is the duty of every Government to provide foolproof security and safeguard the dignity of this institution. Anything contrary should be unacceptable in our democracy.
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) January 6, 2022