Jitendra Awhad | ‘ही कोर्टाची अवमानना’, निकालावर जितेंद्र आव्हाड यांचं परखड भाष्य म्हणाले…
Jitendra Awhad | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कायदेतज्ज्ञ, राजकीय अभ्यासक यांची या निकालाबद्दल वेगवेगळी मत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी निकालावर परखडपणे भाष्य केलं आहे.

Jitendra Awhad | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळकट करणारा ठरला, त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना धक्का बसला. मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. या सगळ्यांना त्यांनी पात्र ठरवलं, तसच शिंदे गटच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचही मान्य केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कायदेतज्ज्ञ, राजकीय अभ्यासक यांची या निकालाबद्दल वेगवेगळी मत आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली होती, राहुल नार्वेकर यांचे काही निर्णय बिलकुल त्या उलट आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान दिल्यास पुढे काय होणार? याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. “आजचा निकाल अपेक्षित होता. ठाकरेंच्या विरोधात निकाल लागणार माहित होतं. गोगावलेंच्या प्रतोपदाला कोर्टाने मान्यता दिली नव्हती” असं देखील आव्हाड म्हणाले. “हा निकाल अनपेक्षित होता, असं म्हणण्याच काही कारण नाही. जे राजकीय विश्लेषक आहेत, राजकीय अभ्यासक आहेत, ते आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. त्यांना माहित होतं, निकाल काय येणार?. हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही शंका नव्हती” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘येह तो होना ही था’
“सर्वोचच न्यायालयाने सुनील प्रभूना प्रतोद म्हणून मान्यता दिली होती आणि गोगावलेंच प्रतोदपद रद्द केलं होतं. याचा अर्थ प्रभूंनी जो व्हीप बजावला, तो व्हीप मान्य करायला हवा होता असं त्याचं स्पष्ट मत होतं. माझ्या मते ही कोर्टाची अवमानना आहे. सर्वोच्च न्यायालयात ही बाब लगेच घेऊन जावी लागेल” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. काल राहुल नार्वेकर यांच निकाल वाचन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक टि्वट केलं होतं. ‘येह तो होना ही था ……न्याया ची अपेक्षा कोणा कडून करता …जनता न्याय करेल” असं त्यांनी टि्वट केलं होतं.